मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'कोरोना लस दिली आता....' सीरमचे अदार पुनावाला यांच्यासाठी बायकोची WISH पाहा काय

'कोरोना लस दिली आता....' सीरमचे अदार पुनावाला यांच्यासाठी बायकोची WISH पाहा काय

14 जानेवारीला अदार पुनावाला (Adar Poonawalla) यांचा 40 वा वाढदिवस साजरा झाला आणि आता अखेर देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. त्याच निमित्तानं त्यांची पत्नी नताशा (Natasha Poonawala) यांनी ही Wish केली आहे.

पुणे, 15 जानेवारी : भारतात कोरोना लसीकरणाची (Corona vaccination) तयारी सुरू आहे. 16 जानेवारीला म्हणजेच उद्यापासून लसीकरण (covid 19 vaccination) सुरू केलं जाणार आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट इंडियानं (pune serum institute of india) ऑक्सफोर्ड- अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या मदतीनं तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लशीचं देशभरात वितरण करण्यात आलं आहे.  या सगळ्या गोष्टीचे श्रेय पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या (SII) अदार पूनावाला( Adar Poonawalla) यांना जातं.

सीरममध्ये रात्रंदिवस मेहनत करून अदार आणि  त्यांच्या टीमने ही लस तयार केली आहे. 14 जानेवारीला त्यांनी आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांची पत्नी नताशा (Natasha Poonawala) यांनी या खास क्षणाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांची दोन्ही मुले आणि वडील सायरस (Cyrus Poonawalla) हेदेखील आहेत. यावेळी केक कापत त्यांनी वाढदिवस साजरा केला.

अदार पुनावाला( Adar Poonawalla’s Birthday) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नताशा यांनी अनेक रात्री जागून त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमानंतर हे सेलिब्रेशन असल्याचे म्हटले आहे. भविष्यात देखील त्यांना असेच यश मिळो तसेच सध्या थोडीशी झोप गरजेची असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

हे वाचा - आता हे काय? कोरोना रुग्णामध्ये दिसली विचित्र लक्षणं; जगातील पहिलंच प्रकरण भारतात

सायरस यांनी 1966 मध्ये सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. त्यानंतर आता सीरम जगभरातील सर्वात मोठी लस उत्पादन करणारी कंपनी असून आदर पूनावाला सर्व कारभार पाहत आहेत.  नताशा यादेखील त्यांच्याबरोबर सीरममध्ये कार्यरत असून त्या कंपनीच्या एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर आहेत.

सध्या सीरम इन्स्टिट्यूट मोठ्या प्रमाणात लशींचं उत्पादन करत असून 1 कोटी डोस भारत सरकारला देणार आहेत. सरकारला 200 रुपयांना एक डोस पडेल. याचबरोबर खासगी मार्केटमध्ये याची किंमत 1 हजार रुपये असणार आहे.

हे वाचा - मेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं

दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत अदार यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) विरूद्ध लढा देण्यासाठी प्रत्येक तिमाहीत नवीन लस सुरू करण्याची योजना आखली असल्याचं म्हटलं होतं. यासाठी सीरम इन्स्टिट्यूट (SII), ब्रिटीश-स्वीडिश औषधनिर्माण कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) यांच्या सहकार्याने ऑक्सफोर्ड लशीच्या 100 कोटी डोसचे उत्पादन करण्याची योजना आहे. याचबरोबर कंपनी मोठ्या प्रमाणात लशीचं उत्पादन करत असून यावर्षीच्या अखेरपर्यंत अनेक देशांना लस वितरित करणार आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लशीची मागणी केल्याचंदेखील यावेळी सांगितलं. त्यामुळे लवकरच सर्वसामान्य भारतीयांना देखील या लशी उपलब्ध होण्याची आशा आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Pune