Home /News /lifestyle /

Nasal Filters : प्रदूषित हवेपासून बचावासाठी नेझल फिल्टर्स; कसं काम करतात फिल्टर्स?

Nasal Filters : प्रदूषित हवेपासून बचावासाठी नेझल फिल्टर्स; कसं काम करतात फिल्टर्स?

Nasal Filters विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. हे फिल्टर्स नाकाच्या आतल्या बाजूस घातल्यानंतर प्रदूषण आणि व्हायरसपासून बचाव होऊ शकतो. हे फिल्टर्स इअरफोन्ससारखे लहान असतात.

मुंबई, 8 जानेवारी : वाढतं वायू प्रदूषण (Air Pollution) हा चिंतेचा विषय आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याला खूप मोठा धोका उत्पन्न होतो. तसंच श्वासोच्छ्वासाशी संबंधित आजारही जडतात. सध्या कोरोनाचा फैलाव वेगाने सुरु आहे, (Coronavirus) संपूर्ण जगाची चिंता यामुळे वाढली आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच असल्याचं समोर येत आहे. कोरोनाबाधितांच्या प्रकृतीवर हवेतल्या प्रदूषणाचा दुष्परिणाम होत असल्याचं डॉक्टर सांगतात. हवेतलं प्रदूषण या स्थितीत अधिक घातक असल्याचा दावाही अनेकांनी केला आहे. हवेतले विविध विषाणू नाकाद्वारे शरीरात जातात आणि आपण आजारी पडतो. प्रदूषित हवेमुळे अनेकांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी सध्या बाजारात नेझल फिल्टर्स' (Nasal Filters) उपलब्ध झाले आहेत. सरकारनेदेखील हे फिल्टर्स वापरण्याचा सल्ला दिला आहे. हे फिल्टर्स कसं काम करतात, हे जाणून घेऊया. याबाबतची माहिती 'टीव्ही 9 हिंदी'ने दिली आहे. नेझल फिल्टर्स विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. हे फिल्टर्स नाकाच्या आतल्या बाजूस घातल्यानंतर प्रदूषण आणि व्हायरसपासून बचाव होऊ शकतो. हे फिल्टर्स इअरफोन्ससारखे लहान असतात. ज्याप्रमाणे आपण इअरफोन कानात घालतो, त्याप्रमाणे हे फिल्टर्स नाकात घातले जातात. या फिल्टर्सद्वारे हवा स्वच्छ होऊन आत जाते. या फिल्टर्सचं काम हवा स्वच्छ करणं हे आहे. यामुळे प्रदूषण, धूळ, गाडीतून निघणारा धोकादायक धूर आणि जीवाणू नाकाद्वारे शरीरात जाण्यापासून फिल्टरद्वारे रोखले जातात. यामुळे शरीरात फक्त शुद्ध हवा जाते. हे फिल्टर्स जास्त महागडे नसून, फक्त 200 ते 500 रुपयांपर्यत उपलब्ध आहेत. आजारी पडल्यानंतर आपल्याला रुग्णालयाचं भरसमाट बिल भरावं लागतं; मात्र हे फिल्टर वापरून तुम्ही आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्याबरोबरच पैशांची बचतही करू शकता. श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर नेझल फिल्टर किंवा एअर प्युरिफायर वापरण्याचा सल्ला काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ट्विटरच्या माध्यमातून दिला होता. तसंच NDMA ने नेझल फिल्टरचे फोटोदेखील शेअर केले होते. हे फोटो पाहिल्यानंतर ते कसे असतात, हे लक्षात येईल. भारताची राजधानी दिल्ली श्वास घेण्यासाठी अक्षरशः झगडत असते. दिल्लीत इतर शहरांच्या तुलनेत हवेच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम जास्तच ठळक जाणवतात. वाढत्या प्रदूषणामुळे हृदय आणि फुफ्फुसाचे आजार होतात. दूषित हवा आयुष्यावर थेट परिणाम करते. त्यामुळे हे फिल्टर्स वापरून तुम्ही प्रदूषणापासून तुमचा बचाव करू शकाल.
First published:

Tags: Air pollution, Health Tips

पुढील बातम्या