नवी दिल्ली, 14 मे : वैशाख मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला नृसिंह जयंती साजरी केली जाते. यंदा नरसिंह जयंती शनिवारी, 14 मे रोजी आहे. यावर्षी वैशाख शुक्ल चतुर्दशी तिथी 14 मे रोजी दुपारी 03:22 वाजता सुरू होईल आणि 15 मे दुपारी 12:45 पर्यंत वैध असेल. नरसिंह जयंतीच्या दिवशी भगवान विष्णूच्या या अवताराची पूजा केल्याने दुःख दूर होते आणि शत्रूंचा नाश होतो. पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराची कथा जाणून (Narasimha Jayanti 2022) घेतली आहे.
नरसिंह अवताराची कथा
पौराणिक कथेनुसार, भाऊ हिरण्यक्षाच्या हत्येमुळे हिरण्यकशपू देवांवर क्रोधित झाला आणि तो भगवान विष्णूला आपला शत्रू मानू लागला. कठोर तपश्चर्येने त्याला अजिंक्य-अमर होण्याचे वरदान मिळाले होते. कोणताही नर किंवा प्राणी त्याला मारू शकत नाही, असे वरदान त्याच्याकडे होते. त्याला घरात किंवा बाहेर, जमिनीवर किंवा आकाशातही मारता येत नव्हते. त्याला दिवसा किंवा रात्रीही अस्त्राने किंवा शस्त्राने मारता येत नव्हते.
या वरदानामुळे तो स्वतःला देव मानून तिन्ही लोकांचा छळ करू लागला. त्याची दहशत इतकी वाढली होती की, देवांनाही त्याची भीती वाटू लागली होती. या संकटातून मुक्त होण्यासाठी सर्व देवतांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी हिरण्यकशिपूच्या जुलमी राजवटीतून सुटका करून घेण्याचे आश्वासन दिले.
हिरण्यकशपूचा मुलगा प्रल्हाद लहानपणापासूनच विष्णूचा भक्त होता. तो असुरांच्या मुलांनाही विष्णूच्या भक्तीसाठी प्रेरित करत असे. हिरण्यकशपूला जेव्हा हे कळले, तेव्हा त्याने प्रल्हादला विष्णूची भक्ती ताबडतोब सोडण्यास सांगितले. मात्र, प्रल्हादने त्यावर नकार दिल्याने हिरण्यकश्यपूला राग आला आणि त्याने आपल्या मुलावर अनेक प्रकारचे अत्याचार केले.
हे वाचा -
या राशींवर शनीची साडेसाती झालेली आहे सुरू; त्रास होतील, जपून करा व्यवहार
एके दिवशी त्याने प्रल्हादला समजावून सांगण्यासाठी राजदरबारात बोलावले. हिरण्यकशपूने पुत्र प्रल्हाद याला विष्णूची भक्ती सोडण्यास सांगितले, परंतु प्रल्हाद तयार झाला नाही. तेव्हा हिरण्यकशपू रागाने सिंहासनावरून उठला आणि म्हणाला की जर तुझा भगवान सर्वत्र उपस्थित आहे तर तो या स्तंभामध्ये का नाही? असे म्हणून त्याने त्या खांबाला जोरात लाथ मारली.
तेव्हा मोठा आवाज झाला आणि त्या स्तंभातून भगवान नरसिंह प्रकट झाले. त्याचे अर्धे शरीर सिंहाचे आणि अर्धे नराचे होते. त्यांनी हिरण्यकशिपूला पकडून घराच्या उंबरठ्यावर नेले, पायावर ठेवले आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याची छाती फाडून हत्या केली. त्यावेळी संध्याकाळ झाली होती.
हे वाचा -
घरात ही झाडं लावण्यापूर्वीच जाणून घ्या वास्तू नियम; कंगालीचं कारण बनतं ते
हिरण्यकशिपूचा वध झाला तेव्हा दिवसही नव्हता, रात्रही नव्हती, सूर्यास्त आणि संध्याकाळ होणार होती. तो ना घरात होता ना बाहेर. त्याला अस्त्र किंवा शस्त्रांनी नव्हे तर नखांनी मारण्यात आले. कोणत्याही नर किंवा प्राण्याने नव्हे तर स्वतः भगवान नरसिंहाने अर्धा नर आणि अर्धा सिंह अवतार घेऊन मारले. त्याचा मृत्यू ना जमिनीवर झाला ना आकाशात, उंबरठ्यावर तो भगवान नरसिंहाच्या पायावर पडलेला होता.
अशा प्रकारे हिरण्यकशिपूचा वध झाला आणि असत्यावर सत्याचा विजय झाला. तिन्ही लोकांमध्ये पुन्हा धर्माची स्थापना झाली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक संदर्भातील आणि संबंधित ज्योतिषी यांनी दिलेली आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.