Home /News /lifestyle /

लॉकडाऊनमध्ये घरात कंटाळा आलाय? आता पोलीसच तुम्हाला देत आहेत FREE TRIP ची संधी

लॉकडाऊनमध्ये घरात कंटाळा आलाय? आता पोलीसच तुम्हाला देत आहेत FREE TRIP ची संधी

न्यूझीलंड, मेक्सिको, कॅनडा अशा विविध देशांमध्ये मोफत फिरण्याची सुवर्णसंधी तुम्हाला नागपूर पोलिसांनी (Nagput police) दिली आहे.

    नागपूर, 8 जुलै : कोरोना लॉकडाऊनमध्ये (corona lockdown) घरात बसून बसून कंटाळा आला आहे. लवकरच कुठेतरी फिरायला जायचा तुम्हीही प्लॅन करत असाल. तर आता नागपूर पोलीस (nagpur police) तुम्हाला फ्री ट्रिपची (free trip) संधी देत आहेत. आश्चर्य वाटलं का? मात्र तुम्ही बरोबर वाचत आहात, कोरोना लॉकडाऊनमध्ये बाहेर पडल्यानंतर जे पोलीस तुमच्या मागे काठी घेऊन धावत आहेत, तुम्हाला घराबाहेर पडण्यापासून रोखत आहेत त्याच पोलिसांनी तुमच्यासाठी फ्री ट्रिप आयोजित केली आहे, मात्र त्यासाठी तुम्हाला एक कोडं सोडवावं लागणार आहे, हे कोडं सोडवलंत तर तुम्ही फ्री ट्रिपवर जाऊ शकाल. नागपूर पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर फ्री ट्रिपसाठी एक अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. ज्यामार्फत तुम्हाला न्यूझीलँड, मेक्सिको, कॅनडा, इंग्लंड, ब्राझील यासारख्या देशांमध्ये सहलीचा मोफत आनंद लुटता येणार आहे. आता यापैकी तुमच्या नशीबात कोणता देश आहे हे तर तुम्ही नागपूर पोलिसांनी दिलेलं कोडं सोडवल्यानंतरच समजेल. प्रत्येक देशाच्या शेजारी एक क्रमांक आहे. हे कोडं सोडवल्यानंतर जे उत्तर येईल, त्या ठिकाणी तुम्हाला विनामूल्य फिरायला जाता येईल. नागपूर पोलिसांनी ट्विट केलं आहे, "1 ते 9 च्या दरम्यान कोणताही अंक निवडा. त्याला तीनने गुणा. आता आलेल्या उत्तरात 3 मिळवा आणि पुन्हा आलेल्या उत्तराला तीनने गुणा. तुम्हाला जे दोनअंकी उत्तर मिळेल त्या दोन्ही अंकांची बेरीज करा. आता जो अंक तुम्हाला मिळेल, त्या क्रमांकाचा देश कोणता आहे पाहा" हे वाचा - आलू आणि मेथी पराठा सोडा; आता तुमच्या ताटात Mask Parottas तुमचं उत्तर काय आलं? 9? बरोबर ना? आता नवव्या क्रमांकावर कोणता देश आहे पाहा. Stay at home म्हणजे घरीच राहा. नागपूर पोलिसांनी दिलेल्या ठिकाणांच्या यादीत हे ठिकाणही आहे. आता तुम्ही एक ते नऊच्या दरम्यान कोणताही क्रमांक निवडलात आणि त्यावर नागपूर पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्यावर गणिती क्रिया केली तरी तुमचं उत्तर नऊच येईल. एकंदरच काय कोरोनाव्हायरसच्या या परिस्थिती तुमच्यासाठी फ्री आणि सुरक्षित असं ठिकाण तुमचं घरच आहे, असं सांगण्याचा उद्देश नागपूर पोलिसांचा आहे. हे वाचा - MASK नाही घातला तर काय? VIDEO पाहाल तर तुम्ही चेहऱ्यावरील मास्क कधीच हटवणार नाही नागपूर पोलिसांनी कोरोनाबाबत जनजागृतीसाठी ही अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे आणि नेटिझन्सनादेखील नागपूर पोलिसांची ही भन्नाट आयडिया आवडली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lockdown, Stay Home, Trip

    पुढील बातम्या