7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला

7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला

आपल्या लेकीसोबतचा हा विमान प्रवासच तिच्यासोबतचा अखेरचा प्रवास ठरेल असा विचार स्वप्नाही या वडिलांनी केला नसेल.

  • Share this:

नागपूर, 20 जानेवारी : उत्तर प्रदेशमधील (Uttar pradesh)  7 वर्षांची आयुषी प्रजापती (Ayushi prajapati) आपल्या बाबांसह विमानानं (Plane) मुंबईला यायला निघाली होती. मुंबईत आयुषीवर उपचार होणार होते. आपल्या चिमुरडीवर लवकर उपचार व्हावेत यासाठी वडिलांनी विमानानं जाण्याचा निर्णय घेतला. लखनऊ-मुंबई गो-एअर (GoAir) विमानातून  ते प्रवास करत होते. पण आपल्या लेकीसोबतचा हा विमानप्रवासच तिच्यासोबतचा अखेरचा प्रवास ठरेल असा विचार स्वप्नाही या वडिलांनी केला नसेल. कार्डियाक अरेस्टमुळे (girl cardiac arrest) तिचा मृत्यू झाला आहे.

आयुषी लखनौ-मुंबई गो-एअर (GoAir) G8307 विमानातून आपल्या वडिलांसह प्रवास करत होती. मिळालेल्या माहितीनुसार जसा विमान प्रवास सुरू झाला तसा तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. जेव्हा तिला समस्या जाणवू लागली तेव्हा क्रू मेंबर्सनी त्यांची बॅग तपासली आणि त्यामध्ये तिचे मेडिकल रिपोर्ट सापडलं. ज्यामध्ये तिच्या शरीरात फक्त 2.5 ग्रॅम हिमोग्लोबिन होतं. तिची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह होती. पण तिच्या तब्येतीबाबत तिच्या वडिलांनी काहीच माहिती दिली नव्हती.

हे वाचा - भंडारा रुग्णालयात 'त्या' दिवशी 10 बाळांचा वाचला असता जीव,अहवालातून माहिती समोर

मुलीची प्रकृती गंभीर झाल्यानं नागपूर विमानतळावर मंगळवारी सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी विमानांच एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. सुरुवातीला खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला तपासलं त्यानंतर सरकारी मेडिकल हॉस्पिटलमध्ये  (GMCH) तिला नेण्यात आलं.

नागपूर विमानतळावर उतरताच किंग्जवे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिला तपासलं. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना या रुग्णालयाचे डॉ. मोहम्मद अथेसेमोद्दीन यांनी सांगितलं की, ती बेशुद्ध झाली होती, तिचं शरीर थंड पडलं होतं आणि कोणतीच प्रतिक्रिया देत नव्हतं. तिची परिस्थिती खूप गंभीर होती.

GMCH अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उंचावर प्रवास केल्यानं तिला हार्ट अटॅक आला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. रुग्णालयानं सांगितलं की, तिला अॅनिमिया होता. तिच्या वडिलांनी याबाबत माहिती दिली नव्हती. नाहीतर तिला विमान प्रवास नाकारण्यात आला असता. ज्यांचं हिमोग्लोबिन 8 ते 10 ग्रॅमच्या खाली असतं त्यांना विमान प्रवास करण्यास परवानगी नसते. आयुषीचं हिमोग्लोबिन फक्त 2.5 ग्रॅम होतं.

हे वाचा - रुग्णालयाच्या दारावर डुक्करांनी तोडले मृतदेहाचे लचके, मन सुन्न करणारी घटना

लेकीचा जीव वाचवण्यासाठी बापानं धडपड केली. तिच्यावर उपचार होतील आणि ती बरी होईल आशेनं ते विमानानं मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. पण याच प्रवासात त्यांच्या लाडक्या लेकीनं जीव सोडला आणि ती त्यांच्यापासून कायमची दूर गेली.

Published by: Priya Lad
First published: January 20, 2021, 3:00 PM IST

ताज्या बातम्या