नागालँड, 12 जानेवारी : एखादी दुर्घटना (accident) घडली की तिथं लोक, संपूर्ण गाव (village) जमा होतं हे तसं नवं नाही. ग्रामस्थ (villager) बचावकार्यासाठी संबंधित यंत्रणेलाही बोलवतात. पण संपूर्ण गावानंच मिळून बचावकार्य केल्याचं कधी ऐकलं किंवा पाहिलं आहे का? कदाचित पाहिलंही असावं पण फक्त फिल्म्समध्ये. जिथं गाव एकत्र येऊन असाध्य गोष्टही साध्य करून दाखवतं. एखादी फिल्मी स्टोरी वाटावी अशीच घटना प्रत्यक्षात घडली आहे नागालँडमध्ये (Nagaland). जिथं दरीत कोसळलेल्या ट्रकला संपूर्ण गावानं एकत्र येऊन बाहेर काढलं आहे. त्यामुळे तब्बल 8 जणांचा जीव वाचला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिमापूरमध्ये (Dimapur) एका माल वाहतूक ट्रकचा अपघात झाला. नियंत्रण सुटल्यानं ट्रक 70 फूट खोल दरीत कोसळला. फेक (Phek) जिल्ह्यातील कुस्तापो (Kutsapo) गावातील ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तिथं येऊन ते फक्त पाहत आणि चर्चा करत राहिले नाही तर त्यांनी बचावकार्य सुरू केलं. त्यांनी ट्रकला दरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला.
In a village in Nagaland (not yet identified) the entire community pulls up a truck which fell off the road with ropes & the spirit of unity!
व्हिडीओत पाहू शकता ग्रामस्थांनी बांबू, दोऱ्यांचा वापर करून ट्रकला बांधलं आणि एकत्र येत दरीतून खेचून बाहेर काढलं. एकमेकांना ते प्रोत्साहीत करतानाही दिसले. नागालँडमधील भाजप नेते महोनलुमो किकोन (Mmhonlumo Kikon) यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर भरपूर प्रतिक्रिया उमटत आहेत.
The IndomitableHumanSpirit ! A prayer to Almighty &it’s all team work.This video from interior #Nagaland exemplifies&showcases the strong social bonds that is so deep rooted in #Naga society. What a way to celebrate our rich cultural heritage!@mygovindia@PMOIndia@MyGovNagalandpic.twitter.com/y78breTf1I
गावात ट्रक काढण्यासाठी पुरेशा मशीन्स नसल्यानं ग्रामस्थांनीच आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि ती यशस्वीही केली. गाव करील ते राव काय करील असं म्हणतात ना. ते इथं प्रत्यक्षात दिसून आलं आहे. एकिचं बळ काय असतं ते दाखवून दिलं आहे.