जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Nag Panchami 2021: उद्या नागपंचमी; जाणून घ्या पुजेसाठीचा शुभ मुहूर्त आणि पौराणिक महत्त्व

Nag Panchami 2021: उद्या नागपंचमी; जाणून घ्या पुजेसाठीचा शुभ मुहूर्त आणि पौराणिक महत्त्व

Nag Panchami 2021: उद्या नागपंचमी; जाणून घ्या पुजेसाठीचा शुभ मुहूर्त आणि पौराणिक महत्त्व

श्रावण महिन्यातील (Shravan month) नागपंचमी हा सण उद्या शुक्रवारी (13 ऑगस्ट) आहे. या विशेष दिवशी नाग देवतेची पूजा (Worship of the Nag devata) केली जाते.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 12 ऑगस्ट : हिंदू दिनदर्शिकेनुसार नागपंचमी ( Nag Panchami) हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या विशेष दिवशी नाग देवतेची पूजा (Worship of the Nag devata) केली जाते. श्रावण महिन्यातील (Shravan month) नागपंचमी हा सण उद्या शुक्रवारी (13 ऑगस्ट) आहे. या दिवशी हस्त नक्षत्र संध्याकाळी 7.58 पर्यंत आणि साध योग संध्याकाळी 6.48 पर्यंत राहील. हे दोन्ही योग अत्यंत फलदायी आहेत. पंचमीची तिथी दुपारी 1.42 पर्यंत राहील, त्यामुळे त्यापूर्वीच नागपंचमीची पूजा करणे योग्य ठरेल. लाईव्ह हिंदूस्थानने याबाबत वृत्त दिले आहे. श्रावण महिना हिंदू धर्मात खूप शुभ समजला जातो. या महिन्यात अनेक उपवास, व्रत- वैकल्य केली जातात. या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना मानला जातो. श्रावण महिना हा भगवान शंकराचा प्रिय महिना समजला जातो. नागदेवता सुद्धा भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांना सर्वाधिक प्रिय असल्याचे मानले जाते. नागदेवता भगवान शंकर यांच्या गळ्यात आहे, तर भगवान विष्णू हे शेषनागावरच विसावतात. नागदेवतेला पाताळ लोकचे स्वामी समजले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, नाग पंचमीला नाग देवतेची पूजा केल्याने त्यांची कृपा कायम राहते आणि नागदेवता घराचे रक्षण करते. World Elephant Day : हत्ती दिन का साजरा होतो? तुम्हीही करू शकता हत्तींचं संरक्षण नाग पंचमीच्या दिवशी धन आणि समृद्धी मिळवण्यासाठी पूजा केली जाते. या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे, हा दोष टाळण्यासाठी त्या व्यक्तीने नाग पंचमीचे व्रत आवश्य करावे. त्याला या दोषापासून मुक्ती मिळते. नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी नागदेवतेला दूध आणि साळ (भात) यांचा नैवद्य दाखवला जातो. या दिवशी सकाळीच अनेकजण ग्लासमध्ये किंवा एखाद्या भांड्यात दूध घेऊन ते नागाच्या चित्रासमोर ठेऊन नैवद्य दाखवतात. सुगंधी उदबत्ती लावून विधिवत धार्मिक पूजा करतात. यादिवशी नागाचे दर्शन घेणे हे अतिशय शुभ मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी गरुड देवाने तक्षक नावाच्या नागाला अभय दिले होते, तेव्हापासूनच नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा चालत आली आहे. International Youth Day 2021: आधीच्या पिढ्यांपेक्षा आजची पिढी आहे ‘हटके' सध्या श्रावण महिना सुरू असून उद्या, शुक्रवारी नागपंचमी आहे. पंचमीची तिथी दुपारी 1.42 पर्यंत राहील, त्यामुळे त्यापूर्वीच नागपंचमीची पूजा करणे योग्य ठरेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: festival , Snake
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात