• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • रहस्यमय गाव! इथले बहुतेक सगळेच नागरिक ठेंगणे; 3 फुटांहून अधिक नाही उंची

रहस्यमय गाव! इथले बहुतेक सगळेच नागरिक ठेंगणे; 3 फुटांहून अधिक नाही उंची

परीकथेतलं लिलीपूट प्रत्यक्षात आहे. या गावातल्या बहुतेक लोकांची उंची 3 फुटांहून अधिक वाढतच नाही. काय आहे रहस्य?

  • Share this:
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: जगात अनेक प्रकारची रहस्यं (Mystery) दडलेली आहेत. यातल्या अनेक गोष्टींमागचं तथ्य कधीच जगासमोर येत नाही. कोणत्याही प्रकारच्या विचित्र कृती घडण्यामागची कारणं समोर आली की लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो; मात्र काही गोष्टींमागची कारणं कधीच स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे लोक अशा गोष्टींना चमत्कार किंवा शाप मानू लागतात. सोशल मीडियावर (Social Media) सध्या अशाच एका शापित गावाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हे गाव चीनमधल्या (China) सिचुआन प्रांतात आहे. या गावातील कोणाचीही उंची तीन फुटांपेक्षा अधिक नसल्याचं दिसून आलं आहे. चीनच्या सिचुआन प्रांतातल्या यांग्सी (Yangsi) गावातल्या नागरिकांविषयीचं हे कोडं अद्याप सुटलेलं नाही. या गावातले बहुतांश नागरिक बुटके (Dwarf) आहेत. या गावातल्या नागरिकांची उंची (Height) वाढत नाही. या गावात राहणाऱ्या बहुतांश नागरिकांची उंची दोन ते तीन फुटांपेक्षा अधिक वाढत नाही. या गावातले 50 टक्के नागरिक हे बुटके आहेत. यापैकी कोणत्याच व्यक्तीची उंची दोन ते तीन फुटांपेक्षा अधिक वाढलेली नाही. ह्रदय प्रत्यारोपण झालेला मुंबईतील पहिला रुग्ण लग्न बंधनात, 30 नोव्हेंबरला विवाह या गावात जन्मलेले नागरिक जन्मतः आरोग्यपूर्ण असतात. पाच ते सात वर्षांपर्यंत त्यांची वाढ सामान्यपणे होते. परंतु, या वयानंतर त्यांची उंची वाढणं थांबतं. या वयानंतर तिथल्या व्यक्तींची उंची वाढून जास्तीत जास्त 3 फूट 10 इंचांपर्यंत जाते. उंची न वाढण्यामागे नेमकं कारण काय आहे, हे अद्याप त्यांना समजलेलं नाही. बहुतांश नागरिक हा शाप (Curse) असल्याचं मानतात. त्यामुळे यांग्सी हे गावच शापित असल्याचं मानलं जातं. यामुळेच तिथल्या नागरिकांची उंची वाढत नसल्याचं बोललं जातं. तुम्हालाही सतत चिंता, अस्वस्थता जाणवते का? नियमित व्यायाम करणं ठरेल खूप गुणकारी या गावाच्या परिसरातले नागरिकदेखील हा वाईट शक्तींचा प्रकोप असल्याचं मानतात. या प्रकारामागे नेमकं काय कारण असावं, याचा शोध घेण्याचा वैज्ञानिकांनी प्रयत्न केला. गावातल्या मातीत पारा म्हणजेच मर्क्युरीचं (Mercury) प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांची उंची पुरेशा प्रमाणात वाढत नसल्याचा निष्कर्ष समोर आला. जपानने चीनच्या दिशेनं विषारी वायू (Toxic Gas) सोडला होता. या विषारी वायूच्या प्रभावामुळे या गावात बुटकेपणाची समस्या निर्माण झाली, असं काही जणांचं मत आहे. परंतु, या रहस्यामागे नेमकं काय कारण आहे, याचं नेमकं उत्तर अद्याप कोणीही देऊ शकलेलं नाही.
First published: