ब्रिटन, 08 सप्टेंबर : एकिकडे कोरोनाव्हायरस
(CoronaVirus) जगभरात थैमान घालतो आहे. कोरोनाचे वेगवेगळे भयंकर व्हेरिएंट समोर येत आहेत. अशात आता आणखी एका महासाथीच्या संकटाचे संकेत मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात कबुतरांचा मृत्यू होतो आहे
(Pigeons Dying In UK). आकाशातून मृत कबुतरांचा पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे नागरिकही आता दहशतीत आहेत.
यूकेच्या Conwy शहरात अचानक आकाशातून मृत कबूतर पडू लागले आहेत. रस्ते, घरासमोरील अंगण, घरांच्या छपरावर मृत कबूतर दिसून येत आहेत. त्यामुळे खळबळ माजली आहे. मृत कबुतरांमुळे नागरिक दहशतीत आहेत. तर प्रशासनाचंही टेन्शन वाढलं आहे. .
गॅरी लॉयड जोंस (Garry Lloyd Jones) या व्यक्तीने आपल्या घरासमोरील अंगणात मृत पडलेल्या कबुतरांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. गॅरीने सांगितलं की, ती नेहमी कबुतरांना खायला घालते. त्यामुळे तिच्या अंगणात शंभरपेक्षा अधिक कबुतरं येतात. पण आता ही संख्या तेरा-चौदावर आली आहे.
हे वाचा - इतक्या वेगाने का पसरतोय Delta variant? संशोधकांना सापडलं मुख्य कारण
ही पोस्ट पाहताच नेटिझन्स यावर व्यक्त झाले. यावर प्रतिक्रिया देताना आजूबाजूच्या परिसरातील लोकांनीही याबाबत सांगितलं आणि त्यांनीसुद्धा असेच मृत कबुतरांचे फोटो शेअर केला. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं.
पक्ष्यांमध्ये महासाथ पसरल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेन्ट, फूड अँड रूरल अफेअर्सच्या मते, कबुतरांमध्ये एव्हिअन फ्लू (Avian flu) पसरला आहे. यामुळे एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात मृत कबूतर सापडत असावेत. Conwy च्या काऊसिलच्याही ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.
हे वाचा - Covid-19 च्या लक्षणांत होताहेत बदल; ही नवी लक्षणं दिसली तर सावधान!
या प्रकरणात तपास सुरू करण्यात आला आहे. मृत कबुतरांची तपासणी केली जाते आहे. जर ही एखादी महासाथ असेल तर लगेच इतर कबुतरांवर उपचार सुरू केले जातील, असं सांगण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.