Home /News /lifestyle /

अरे देवा! कोरोना, बर्ड फ्लू आणि आता आणखी एका अज्ञात आजाराचं संकट

अरे देवा! कोरोना, बर्ड फ्लू आणि आता आणखी एका अज्ञात आजाराचं संकट

खरंतर डिसेंबरमध्ये या अज्ञात आजाराचे (mysterious disease) काही रुग्ण आढळले होते. तशीच लक्षणं या नव्या रुग्णांमध्येही दिसून येत आहेत.

    एम. बालकृष्णन/एलुरू, 22 जानेवारी : गेले वर्षभर कोरोनाव्हायरसचं थैमान, त्यात या वर्षात बर्ड फ्लूनं डोकं वर काढल्यानं माणसांच्या जीवाला घोर आणि हे कमी की काय म्हणून आता अज्ञात आजाराचं (mysterious disease) संकट येऊन ठेपलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) या अज्ञात आजाराचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अज्ञात आजाराचे रुग्ण आढळले होते, तशीच लक्षणं नव्यानं आढळलेल्या रुग्णांमध्येही दिसून आली आहेत. पश्चिम गोदावरी (West Godavari ) जिल्ह्यातील एलुरूमध्ये गेल्या दिवसांपूर्वी अज्ञात आजाराचे काही रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर या रुग्णांमध्ये जी लक्षणं दिसून आली आहेत, तशीच लक्षणं असलेले रुग्ण पुल्ला (Pulla) आणि कोमिरेपल्ली (Komirepalli) गावातही आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये एपिलेप्सीची लक्षणं दिसतं आहेत. काही रुग्ण बेशुद्ध होत आहेत. तसंच काहींना मळमळ आणि इतर लक्षणंही दिसून येत आहेत.त्यांच्यावर एलुरू सरकारी रुग्णालयात (Eluru government hospital) उपचार सुरू आहेत. रिपोर्टनुसार एकाच जिल्ह्यातील 22 गावातील लोकांना हा आजार झाला आहे. तब्बल 700 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे वाचा - अवैध लशीचा भयंकर दुष्परिणाम! कोरोनानंतर आणखी एका आजाराचं संकट मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याकडे गांभीर्यानं लक्षण दिलं आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी काही अधिकाऱ्यांना तिथं पाठवलं आलं आहे. दरम्यान राज्याच्या आरोग्य विभागानं लोकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एल्लूरूमध्ये आजाराचे अनेक रुग्ण आढळून आले. चीनमध्येही आफ्रिकन स्वाइन फिव्हर तर ज्या चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा सर्वात आधी उद्रेक झाला त्या चीनमध्ये आता आफ्रिकन स्वाइन फिव्हरचं संकट आहे. स्वाइन फिव्हर (swine fever) व्हायरसच्या दोन नव्या स्ट्रेननं डोकं वर काढलं आहे. सध्या तरी हा आजार माणसांमध्ये नाही तर डुकरांमध्ये (pig) पसरला आहे आणि यासाठी विना परवाना लस कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Andhra pradesh, Disease symptoms, Serious diseases

    पुढील बातम्या