• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • अरे देवा! कोरोनानंतर आता अज्ञात आजाराचं थैमान, थेट मेंदूवरच करतोय अटॅक; 6 जणांचा घेतला बळी

अरे देवा! कोरोनानंतर आता अज्ञात आजाराचं थैमान, थेट मेंदूवरच करतोय अटॅक; 6 जणांचा घेतला बळी

कोरोनाच्या संकटातच आता नवा अज्ञात आजार हातपाय परसतो आहे.

 • Share this:
  उटावा, 08 ऑक्टोबर : एकिकडे कोरोनाव्हायरस (Coronavirus) अजूनही थैमान घालतोच आहेत तर दुसरीकडे आता आणखी एका नव्या आजाराचं (Mysterious  disease) संकट ओढावलं आहे (Mystery illness outbreak). कॅनडामध्ये (Canada) या आजाराचे 50 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत, तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यू ब्रन्सविक प्रांतात (Canadian province of New Brunswick) या अज्ञात आजाराने हातपाय पसरले आहे (Mysterious brain disease). हा मेंदूसंबधी आजार आहे (unknown brain disease).  स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत 48 रुग्णांना हा आजार झाला आहे. 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत रुग्ण 18 ते 85 वयोगटातील होते. हे वाचा - छातीतील वेदनेने त्रस्त होती व्यक्ती; हृदयात सापडलं असं काही की डॉक्टरही शॉक या आजारात न्यूरोलॉजिकल लक्षणं दिसून येत आहेत. रुग्णांना काहीच लक्षात राहत नाही, त्यांना काही सूचकही नाही. त्यांना मेंदू थकल्यासारखा वाटतो.  चिंता, चक्कर येणं, भ्रम होणं, वेदना, विसरणं अशा समस्या त्यांना उद्भवत आहेत. हा आजार झालेल्या एका मुलीने सांगितलं की तिने तर आपल्या मांसपेशींवरील नियंत्रणही गमावलं आहे. काहीच नवी माहिती तिच्या लक्षात राहत नाही म्हणून तिला पुन्हा पुन्हा टीव्ही शो पाहावा लागतो आहे. डॉक्टरांनासुद्धा या आजाराचं नेमकं कारण समजलं नाही आहे. स्थानिक प्रशासनाने या अज्ञात न्यूरोलॉजिकल सिंड्रोमबाबत माहिती मिळवायला सुरुवात केली आहे. हे वाचा - Corona परतीचं Countdown सुरू! WHO कडून कोरोनाबाबत दिलासादायक वृत्त कॅनडातील सार्वजनिक आरोग्य संस्थेने  (PHAC) गेल्या वर्षी याच क्षेत्रात असामान्य न्यूरोलॉजिकल प्रकरणांबबात इशारा दिला होता. आता मृतांची तपासणी सुरू आहे.  तर रुग्ण सुरक्षा संघटना ब्लड वॉचने सांगितलं की किती लोक या आजाराने पीडित आहेत आणि पुढे किती जणांचा मृत्यू होईल माहिती नाही. या आजाराचं मूळ कारण लवकरच समजायला हवं.
  Published by:Priya Lad
  First published: