लैंगिक शक्ती वाढवतं हे त्रिफळा चूर्णातलं एक फळ; जाणून घ्या याचे इतर लाभ

लैंगिक शक्ती वाढवतं हे त्रिफळा चूर्णातलं एक फळ; जाणून घ्या याचे इतर लाभ

पोट साफ होण्यापासून ते लैंगिक समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात या वनस्पतीच्या फळाचा वापर होतो. त्रिफळाच्या तीन फळांपैकी हे एक आहे.

  • Last Updated: Sep 25, 2020 10:18 PM IST
  • Share this:

आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या बर्‍याच रोगांच्या उपचारांमध्ये प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. अशीच एक औषधी वनस्पती हिरडा आहे. हरितकी म्हणून देखील ओळखली जाते. हे त्रिफळाच्या तीन फळांपैकी एक आहे. नियमितपणे हिरड्याचे सेवन केल्याने पाचन तंत्रापासून मूळव्याधापर्यंतची समस्या दूर होऊ शकते. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणतात की ही एक अतिशय प्रसिद्ध कायाकल्पिक औषधी वनस्पती आहे. या झाडाची फळे, मुळे आणि साल आयुर्वेदिक औषधी तयार करण्यासाठी वापरतात. हिरड्यामध्ये मीठ वगळता पाच रस म्हणजेच गोड, तिखट, कडू, तुरट आणि आंबट सापडतात. या औषधामध्ये खनिज, जीवनसत्व, प्रथिने, जीवाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ व प्रतिजैविक गुणधर्म आहेत. याचे बिया असलेले फळ खाल्ले जाऊ शकते. हिरड्या चे इतर फायदे जाणून घ्या.

त्वचा आणि केसांच्या समस्यांसाठी

हिरड्याची पावडर त्वचा आणि केसांच्या समस्यांपासून मुक्त करू शकते. मुरुम काढून टाकण्यासाठी हिरड्याची पूड गरम पाण्यात मिसळा आणि थंड झाल्यावर त्याची पेस्ट बाधित भागावर लावा. केस गळती असो किंवा डोक्यातील कोंडाची समस्येबद्दल तक्रार, आवळ्याच्या तेलात हिरड्याची पावडर मिसळा आणि केसांत लावा.

पचनशक्ती सुधारते

नियमितपणे हिरड्याचे सेवन केल्याने अन्नातील पोषक द्रव्यांचे शोषण वाढते आणि आतड्या निरोगी राहतात. 2-3 ग्रॅम हिरड्याची पावडर कोमट पाण्यात टाकून प्यायल्याने पचन सुधारण्यास मदत होते.

मूळव्याध कमी करण्यासाठी

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. नबी वली म्हणतात की मूळव्याध, म्हणजेच गुदद्वार आणि गुदाशयातील नसांमधे मूळव्याधामुळे सूज आणि तणाव निर्माण होतो. हिरड्या मध्ये मल पातळ करण्याचे गुणधर्म असल्याचे आढळले आहे, ज्यामुळे पोटा संबंधित समस्या कमी होऊ शकतात आणि मूळव्याधामध्ये आराम मिळू शकतो. अर्धा बादली पाण्यात दोन चमचे हिरडा घालून अंघोळ करा. यामुळे सूज कमी होईल आणि जखमा लवकर भरतील.

खोकल्यासाठी फायदेशीर

हिरडा खोकला, ब्राँकायटिस आणि फुफ्फुसांच्या समस्येसाठी वापरली जाते. अर्धा चमचा मधात हिरड्याची पावडर मिसळून चाटण तयार करून त्याचे सेवन करा.

लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी

लैंगिक समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात हिरड्याचा वापर केला जातो. लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी, एका महिन्यासाठी दररोज 1-2 ग्रॅम हिरड्याची पावडर खा. अकाली स्खलन होण्यावर याचा उपचार करणे फायदेशीर आहे. हिरड्याचा वापराबद्दल हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जर आपण जास्त काळासाठी त्याचा वापर केला, तर याचे गरम आणि तुरट गुणधर्मांमुळे लैंगिक शक्तीचा अभाव देखील होऊ शकतो.

उलट्या आणि मळमळ मध्ये आराम

उलट्यांसाठी हिरड्याचा वापर केल्यास त्वरित आराम मिळतो. जर मळमळ होत असेल तर आपण हिरड्याचे सेवन करू शकता. हिरड्याची पावडर मधा सह घेतल्यास ही समस्या दूर होते.

तोंडाचा आणि पोटाचा अल्सर

हिरड्या चा वापर पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो, यात जिवाणूंनी होणारे दुष्परिणाम नष्ट करणे आणि अल्सर काढून टाकण्याचे गुणधर्म आहेत. हिर्ड्याचा वापर तोंडाच्या आणि पोटाच्या अल्सरपासून बचाव करण्यासाठी लाभदायी आहे. हिरड्या ची पावडर सुक्या मेव्यात मिसळा आणि ते पाण्यात उकळवून खा. हे पावडर माउथवॉश म्हणून वापरा. हे दात आणि हिरड्यांच्या रोग टाळण्यास प्रभावी औषध आहे.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - आरोग्यदायी आहार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 25, 2020, 10:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading