मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हिवाळ्यात गरम कपडे घालण्यास करू नका टाळाटाळ, होऊ शकतात हे गंभीर आजार

हिवाळ्यात गरम कपडे घालण्यास करू नका टाळाटाळ, होऊ शकतात हे गंभीर आजार

सर्वत्र मोठ्या प्रमाणात थंडी आहे. या वातावरणात काही लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना गंभीर समस्यांना समोरे जावे लागू शकते. तुम्ही कमी तापमानात घराबाहेर पडाल तर तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे असा सल्ला तज्ञ देतात.

सर्वत्र मोठ्या प्रमाणात थंडी आहे. या वातावरणात काही लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना गंभीर समस्यांना समोरे जावे लागू शकते. तुम्ही कमी तापमानात घराबाहेर पडाल तर तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे असा सल्ला तज्ञ देतात.

सर्वत्र मोठ्या प्रमाणात थंडी आहे. या वातावरणात काही लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना गंभीर समस्यांना समोरे जावे लागू शकते. तुम्ही कमी तापमानात घराबाहेर पडाल तर तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे असा सल्ला तज्ञ देतात.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 जानेवारी : हिवाळ्यात पहाडी प्रदेशात जाण्याचे आणि बर्फवृष्टीचा आनंद लुटण्याचे अनेकांचे स्वप्न असते. या हंगामात मोठ्या संख्येने लोक हिल स्टेशनला भेट देतात आणि थंड वातावरणाचा आनंद घेतात. परंतु सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात थंडी आहे. या वातावरणात काही लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना गंभीर समस्यांना समोरे जावे लागू शकते. तुम्ही कमी तापमानात घराबाहेर पडाल तर तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे असा सल्ला तज्ञ देतात. विशेषतः पहाडी प्रदेशात जाताना निष्काळजीपणा अजिबात करू नये.

तुम्ही कमी तापमानात योग्य प्रमाणात उबदार कपडे परिधान केले नाही तर तुमच्या शरीराचे तापमान झपाट्याने कमी होऊ शकते आणि हायपोथर्मिया, फ्रॉस्टबाइट यासह अनेक गंभीर परिस्थितींना तुम्ही बळी पडू शकता. या सर्व आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती आहेत ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला योग्य वेळी उपचार न मिळाल्यास काही मिनिटांत त्याचा मृत्यू होऊ शकतो. तुम्ही प्रचंड थंडीत राहिल्यास तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसेच या समस्या कशा टाळता येतील हे देखील जाणून घेऊया.

दीर्घायुष्याचं रहस्य कळलं? वाचा, शास्त्रज्ञांना काय आढळून आलं?

अति थंडीमुळे उद्भवू शकतात या समस्या

हायपोथर्मिया - सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या अहवालानुसार, हायपोथर्मिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये तीव्र थंडीमुळे शरीराचे तापमान झपाट्याने कमी होऊ लागते. शरीरातील साठलेली ऊर्जाही संपुष्टात येते आणि शरीर थंड व निळे पडते. या स्थितीत व्यक्ती थरथर कापू लागते. विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमताही नष्ट होते. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास हायपोथर्मियामुळे काही तासांत मृत्यू होऊ शकतो. नीट उबदार कपडे न घातल्याने ही समस्या उद्भवते.

फ्रॉस्टबाइट - अति थंडीमुळे शरीराच्या काही भागांना इजा होऊन ते भाग सुन्न होतात. प्रभावित भागाचा रंगही बदलतो. या स्थितीला फ्रॉस्टबाइट म्हणतात. यामुळे शरीरातील ऊतींना कायमचे नुकसान होऊ शकते. सहसा ही समस्या नाक, कान, बोटे, अंगठा आणि गालांवर परिणाम करते. कडाक्याच्या थंडीत नीट उबदार कपडे न घातल्यानेही फ्रॉस्टबाइटची समस्या उद्भवते.

ट्रेंच फूट - हिवाळ्यात तुमचे पाय ओले राहिल्यास त्यांना इजा होते, याला ट्रेंच फूट म्हणतात. या अवस्थेत पायांना योग्य रक्तपुरवठा होत नाही आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचेच्या टिशू डेड होऊ लागतात. त्यामुळे हिवाळ्यात पाय ओले ठेवू नयेत हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. कोणत्याही ऋतूमध्ये पाय ओले ठेवल्यास ही समस्या उद्भवू शकते.

चिलब्लेन्स - बराच वेळ अत्यंत कमी तापमानात राहिल्यानंतर तुम्ही ताबडतोब खूप उष्ण ठिकाणी पोहोचलात तर ते तुमच्या त्वचेच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते. या स्थितीला चिलब्लेन्स म्हणतात. त्यामुळे त्वचेवर लालसरपणा येतो आणि खाजही येऊ लागते. सहसा ही समस्या कान, बोटे, अंगठा आणि गालावर उद्भवते.

सैनिकाच्या छातीत हृदयाजवळच अडकला जिवंत बॉम्ब; सर्जरी करून डॉक्टर काढायला गेले आणि...

या समस्या कशा टाळाव्या?

हिवाळ्यात घराबाहेर पडताना अधिकाधिक उबदार कपडे घालावे. खूप थंड ठिकाणी जाणे टाळावे आणि गरम पदार्थ खात राहावे. तुम्ही हिल स्टेशनला जात असाल तर तिथे तुमच्यासोबत उबदार कपडे घेऊन जा आणि तुमच्या आरोग्याबाबत सावध रहा. हिवाळ्यात हात पाय कमी ओले करा आणि सर्व खबरदारी घ्या. अचानक थंड वातावरणातून खूप गरम ठिकाणी जाऊ नका अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Winter