Home /News /lifestyle /

काश्मीरच्या लहानशा गावातल्या मुस्कानला मिळाला युवा संशोधक पुरस्कार, गावकरी आनंदले!

काश्मीरच्या लहानशा गावातल्या मुस्कानला मिळाला युवा संशोधक पुरस्कार, गावकरी आनंदले!

लहान गावातील मुली वेगळ्या क्षेत्रात करियर करत यश मिळवताना दिसत आहेत. जम्मू-काश्मीरच्या मुस्कानुन्निसाची गोष्टही अशीच आहे. तिने कुठल्या विषयावर संशोधन केलंय पाहा

    श्रीनगर, 31 डिसेंबर : लहान गावातील मुली वेगळ्या क्षेत्रात करियर करत यश मिळवताना दिसत आहेत. जम्मू-काश्मीरच्या मुस्कानुन्निसाची गोष्टही अशीच आहे. तिने कुठल्या विषयावर संशोधन केलंय पाहा. जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) एका मुलीला तिनं केलेल्या संशोधनासाठी (research) मोठा पुरस्कार (award) मिळाला आहे. ती गेल्या काही वर्षांपासून औषधी वनस्पतींबाबत (medicinal plants) सतत संशोधन करत होती. या मुलीचं नाव आहे मुस्कानुन्नीसा. जम्मू-काश्मीरच्या गंदरबाल क्षेत्रातील आरामपुरा भागात ती राहते. मुस्कानुन्नीसाला यंदाचा हर रायजिंग पुरस्कार मिळाला आहे. वूमन स्टार्टर्स श्रेणीत मिळालेला हा पुरस्कार तिनं गेली काही वर्ष सलग केलेल्या संशोधनाचं फळ आहे. मुस्कान शेर-ए-काश्मीर कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात शिकली आहे. ती म्हणते, की मी त्या सर्व मुलींसाठी प्रेरणा बनले आहे ज्या आपली स्वप्नं पूर्ण करू इच्छितात. मुस्कानला लहानपणीपासूनच फॉरेस्ट्री विषयाची आवड होती. ती नेहमी शाळा-कॉलेजात होणाऱ्या वाद-विवाद स्पर्धा आणि मार्शल आर्टमध्ये सहभाग घ्यायची. बॅचलर्सचं शिक्षण घेताना तिनं एका स्पर्धेत भाग घेतला. इथं तिचा विषय होता, रिओरियंटेशन ऑफ एग्रीकल्चरल एजुकेशन'. या सेशनमध्ये तिनं केलेल्या मांडणीचं खूप कौतुक झालं. मुस्कानउन्निसा म्हणाली, की तिला औषधी वनस्पतींबाबत आपलं संशोधन भविष्यातही असंच सुरू ठेवायचं आहे. कारण यातून तिला ज्ञानासह आत्मविश्वासही मिळतो. मुस्कानचा भाऊ जिशान म्हणतो, की त्याला आपल्या बहिणीचा खूप अभिमान वाटतो. याशिवाय केवळ जिशान नाही तर सगळं जम्मू-काश्मीर मुस्कानच्या या यशामुळे आनंदित झालं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Woman

    पुढील बातम्या