मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वेदना कमी करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी आता ऐका म्युझिक; तज्ज्ञांनी केलं संशोधन

वेदना कमी करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी आता ऐका म्युझिक; तज्ज्ञांनी केलं संशोधन

मानसिक, शारीरिक वेदनांमधून बरं होताना म्युझिक थेरपीचा वापर उपयुक्त ठरू शकतो. ब्रिटनमधल्या एका संशोधनातून काय समोर आलं आहे वाचा...

  • Published by:  Manoj Khandekar

लंडन, 12 मार्च : गाणं ऐकलं की प्रसन्न वाटतं. तुमचा मूडही बदलतो... हा अनेकांचा अनुभव असतो. याच संगीताचा उपयोग तुमची तब्येत चांगली ठेवण्यासाठी होऊ शकतो. स्ट्रोक आलेल्या रुग्णांना, तसंच मानसिक, शारीरिक रोगातून बरं होताना संगीत उपयुक्त ठरू शकतं. संगीत उपचार अर्थात म्युझिक थेरपीमुळे तुमच्या वेदनाही कमी होऊ शकतात, असं संशोधनातून पुढे आलं आहे.

एखाद्या दुर्धर आजारावर मात करताना, तुमचा मूड चांगला राहणं यासाठी किंवा एकाग्रतेत वाढ व्हावी यासाठी म्युझिक थेरपीचा चांगला वापर होऊ शकतो. एखाद्या आजारावरच्या औषधांसोबत म्युझिक थेरपीचा वापर केला जाऊ शकतो.  UK मधील अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यावर अभ्यास केला. या अभ्यासासाठी संशोधकांनी 177 जणांची निवड केली होती. दोन वर्षांच्या कालावधीसाठी तब्बल 675 म्युझिक थेरेपी सत्रांमध्ये त्यांनी भाग घेतला. या सत्रांमध्ये ड्रम, गिटारसह अनेक वाद्यांचा समावेश होता.

वाचा - पुरुषांमध्येही वाढतोय स्तनांच्या कॅन्सरचा धोका, पाच वर्षात 21 टक्क्यांची वाढ

या सत्रांमध्ये म्युझिक थेरपीबरोबरच फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी आणि क्लिनिकल सायकोलॉजी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. या सत्रांमध्ये सहभागी झालेल्यांच्या मूडमध्ये सुधारणा पाहायला मिळाली, उदासीनतेचं प्रमाणही कमी झालं, आणि उत्साह वाढल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं. स्पीच अँड लँग्वेज थेरपीनं काहींच्या स्वभावात सकारात्मक बदल झाल्याचं संशोधकांनी सांगितलं. त्यामुळे तुम्हाला कोणता ताण असेल, काही आजार असेल तर म्युझिक थेरपी तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल.

अन्य बातम्या

सावधान ! मास्कनंतर आता हँड सॅनिटायझरही बनावट, कारखान्यावर छापा

काळजी वाढली! कोरोनाची लक्षणं दिसायला लागत आहेत 5 ते 14 दिवस

First published:

Tags: Health, Lifestyle