Home /News /lifestyle /

सबस्क्रिप्शन बेस्ड Porn App रॅकेटचा मुंबईत झाला पर्दाफाश; OTT वर पॉर्न दाखवल्याप्रकरणी 9 जण अटकेत

सबस्क्रिप्शन बेस्ड Porn App रॅकेटचा मुंबईत झाला पर्दाफाश; OTT वर पॉर्न दाखवल्याप्रकरणी 9 जण अटकेत

अर्ध्या तासाचे चित्रपट OTT प्लॅटफार्मच्या धर्तीवर असणाऱ्या विविध अ‍ॅप्सवर अपलोड केले जात होते. त्यासाठी दरमहा 199 रुपये देखील आकारली जात होती. पोलिसांना पॉर्नोग्राफिक कंटेंट स्ट्रिमिंग करणारे 12 अ‍ॅप्स आतापर्यंत आढळून आले आहेत.

मुंबई, 23 फेब्रुवारी : पोलिसांनी मुंबई आणि परिसरातील बंगल्यांमध्ये लो बजेट पॉर्न फिल्मस (Porn Films) तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. हे अर्ध्या तासाचे चित्रपट ओटीटी प्लॅटफार्मच्या (OTT Platforms) धर्तीवर असणाऱ्या विविध अ‍ॅप्सवर अपलोड केले जात होते. त्यासाठी दरमहा विशिष्ट रक्कम देखील आकारली जात होती. पोलिसांना पॉर्नोग्राफिक कंटेंट स्ट्रिमिंग (Pornography Content Striming)  करणारे 12 अ‍ॅप्स आतापर्यंत आढळून आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. तसंच पॉर्न फिल्मसची निर्मिती, त्या विविध अ‍ॅप्सला विकल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्यांमध्ये अभिनेत्री गहना वशिष्टचाही समावेश आहे. किती असते यासाठी गुंतवणूक? द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अशा प्रकारच्या शुटिंगसाठी मुंबईबाहेरील बंगले 10 हजार रुपये प्रतिदिन या दराने भाडेतत्वावर दिले जातात. यासाठी कलाकारांना 10 हजार रुपये दिले जातात. या चित्रपटांमध्ये कथानक, संवाद आदी घटकांमधील गुंतवणूक फारशी नाही. शुटिंग सुरू असलेल्या एका घरावर पोलिसांनी छापा टाकला असता त्यांना संवादांसह दोन पानांचं स्क्रिप्टही आढळलं.

या चित्रपटांचं चित्रीकरण मुंबईतच का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात काही आरोपींना यापूर्वीही अटक करण्यात आली होती. त्यापैकी काही जण हे शहराबाहेरील होते आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये (Bollywood) काम केलं होतं. इंडस्ट्रीत येऊ इच्छिणाऱ्या महत्वाकांक्षी कलाकारांची फसवणूक करुन त्यांना मुख्य प्रवाहातील चित्रपट किंवा मालिकांमध्ये भूमिका देण्याचं अमिष दाखवत पैश्यांसाठी त्यांच्याकडून जबरदस्तीने अशी कामे करुन घेतली जात असावी अशी शक्यता नाकारता येत नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे. (वाचा -   गँगस्टर रवी पुजारीचा खरा फोटो आला समोर, मुंबई पोलिसांनी केली अटक)

अशी मिळते अ‍ॅप्सची माहिती? या अ‍ॅप्समधून कन्टेंट लिंक फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामसारख्या सोशल मिडीया प्लॅटफार्मवर (Social Media Platform) देण्यात येते. हे अ‍ॅप्स ओटीटी प्लॅटफार्मप्रमाणे दर आठवड्याला एपिसोड स्वरुपात विविध शो ऑफर करतात. भारतातील कायदे पॉर्नोग्राफीबद्दल काय म्हणतात? यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने सरकारला पॉर्नोग्राफिकल वेबसाईट बंद करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार देशात या वेबसाईट्स बंद करण्यात आल्या. सध्या कोणीही पॉर्न प्रसारित करताना आढळून आल्यास त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 (A) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. (सुस्पष्ट लैंगिक कृत्य असलेली सामुग्री प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासाठी शिक्षा) या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येते.
Published by:news18 desk
First published:

Tags: Crime news, Mumbai police, Porn sites, Social media

पुढील बातम्या