बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांची भरती, 'या' आहेत जागा

तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालुन आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण 291 जागांची भरती काढण्यात आली आहे. नेमक्या कोणत्या जागांसाठी भरती काढण्यात आली आहे ते जाणून घ्या

  • Share this:

बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण 291 इंजिनिअरसाठी जागांची भरती काढण्यात आली आहे. यामध्ये एकूण तीन प्रकारच्या इंजिनिअरसाठी मिळून ही जागा काढण्यात आली आहे.

सिव्हिल इंजिनिअरसाठी एकूण 190 जागा आहेत तर मॅकॅनिकल आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअरसाठी 92 जागांची भरती आहे. त्याचबरोबर आर्किटेक्ट इंजिनिअरिंग केलेल्यांसाठी एकूण नऊ जागा असणार आहेत.

सिव्हिल इंजिनिअरच्या जागेसाठी तुमची पात्रता असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सिव्हिल आणि कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंगची पदवी असणं गरजेचं आहे किंवा भारताच्या इंजिनिअर संस्थेमधून सिव्हिल इंजिनिअरिंग ए किंवा बी ग्रेडने उत्तीर्ण असावं लागेल.

मॅकॅनिकल/ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंगची पदवी असावी किंवा इंजिनिअरिंग असोसिएशनमधून ए किंवा बी ग्रेडने उत्तीर्ण असावं

अर्ज करण्यासाठी आर्किटेक्ट इंजिनिअरची पदवी असणं गरजेचं आहे किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्ट संस्थेचे सभासद असावं लागेल. त्याचबरोबर कलाभवन वडोदरा महाराष्ट्र सरकारच्या तंत्र शिक्षण मंडळातून वास्तूशास्त्रात डिप्लोमा केलेला असावा.

यासर्व इंजिनिअर जागांसाठी वयाची अट ठेवण्यात आली आहे. 18 वर्षांपासून ते 38 वर्षांपर्यंतची व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकते. तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षाची अट आहे. अर्ज भरण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या वेबसाईडला भेट द्या.

यासर्व जागांसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तसेच यासाठी फीसुद्धा भरावी लागेल. खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 300 रुपये अशी किंमत ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबरपर्यंत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 02:39 PM IST

ताज्या बातम्या