Home /News /lifestyle /

दुर्दैवी! ढोकळा खाताना ठसका लागला आणि जीव गेला; मुंबईतील डॉक्टर नवरीची वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

दुर्दैवी! ढोकळा खाताना ठसका लागला आणि जीव गेला; मुंबईतील डॉक्टर नवरीची वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Mbbs bride died after ate dhokla for breakfast before wedding : लग्नाच्या आदल्या दिवशी नवरीने ढोकळा खाल्ला आणि तोच तिच्या जीवावर बेतला.

    भोपाळ, 20 मे : घरात लगीनघाई सुरू होती. माहेरच्या घरात तिचा शेवटचा दिवस. सर्वजण तिचे लाड पुरवत होते. पण हा दिवस तिचा फक्त माहेरच्या घरातील नव्हे तर तिच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरेल.  ती  फक्त माहेर नव्हे तर जगच सोडून जाणार आहे याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. लग्नाच्या वरातीऐवजी तिची अंत्ययात्राच काढावी लागली. लग्नाच्या आदल्यादिवशी डॉक्टर नवरीबाईचा मृत्यू झाला आहे आणि याला कारण ठरला तो एक ढोकळा (Mbbs bride died after ate dhokla for breakfast). नाश्त्यात ढोकळा खाल्ल्यानंतर नवरीबाईला ठसका लागला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे (Doctor bride died before wedding).  मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील ही घटना. झी न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार पश्चिम बुधवारी बाजारात राणारे प्रमोद काळे यांची मुलगी मेघा. जी एक डॉक्टर होती. मुंबईत तिने MBBS चं शिक्षण पूर्ण केलं होतं.  मुंबईतच ती प्रॅक्टिसही करत होती. आज 20 मे रोजी तिचं लग्न होतं. लग्नासाठी म्हणून ती आपल्या गावी गेली होती. हे वाचा - Shocking Video! लग्नात नाचता नाचता अचानक गेला व्यक्तीचा जीव; कॅमेऱ्यात कैद झाला 'मृत्यू' लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे 19 मे रोजी तिने सकाळी नाश्त्यात ढोकळा खाल्ला. ढोकळा खाताना तो तिच्या गळ्यात अडकला. त्यामुळे ती पाणी प्यायली. त्यानंतर तिला ठसका लागला. बराच वेळ ती खोकत होती. त्यानंतर तिची प्रकृती जास्त बिघडली. तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. हळदीदिवशीच डॉक्टर नवरीचा मृत्यू झाला. घरातील लग्नामुळे आनंदाचं वातावरण शोकाकुल वातावरणात बदललं. ज्या लेकीची सासरी पाठवणी करायची होती. तिने जगाचाच कायमचा निरोप घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्नाच्या आदल्या दिवशीच तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जाते आहे. साबुदाणा घशात अडकल्याने चिमुकल्याचा मृत्यू याआधी सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वडाची वाडी इथं गेल्या वर्षी महाशिवरात्रीला अशीच एक घटना घडली होती.  11 वर्षीय मुलाच्या घशात साबुदाणा अडकला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. रोहन सिद्धेश्वर निळे असं या मुलाचं नाव. रोहनच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन हा दिव्यांग होता. त्याला अधून मधून झटकेही येत होते. महाशिवरात्री निमित्त त्याच्या घरात साबुदाना करण्यात आला होता. या मुलाने दुपारी 4 च्या सुमारास हा साबुदाना खाल्ला होता. मात्र जेवणानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याला माढ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यानंतर त्याची रवागनी माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. मात्र उपचारापूर्वीच तो मरण पावला होता. हे वाचा - Big B Amitabh Bachchan यांच्यासारखा भारदस्त आवाज काढणं आता कठीण नाही; डॉक्टरला उपाय सापडला दैनिक पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, रोहन जेवण करताना त्याला ठसका लागला. त्यामुळे अन्ननलिकेतील घास श्‍वसनलिकेत अडकला. यामुळेच त्याचा गुदमरून मृत्यू झाला, असं डॉक्टरांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bride, Death, Lifestyle, Madhya pradesh, Wedding

    पुढील बातम्या