Heart Attack येताच सगळ्यात आधी करा हे 5 उपाय

Heart Attack येताच सगळ्यात आधी करा हे 5 उपाय

मॅरेथॉनमध्ये धावण्याच्या वेळी इतर दोन धावपट्टूंना हृदयविकाराचा झटका आला. पण त्यापैकी एकाला रुग्णालयात दाखल केले आहे तर दुसर्‍याला व्यक्तीचा डिस्चार्ज झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : रविवारी आजोजित केलेल्या मुंबई मॅरेथॉन 2020मध्ये  धावताना हृदयविकाराच्या झटक्याने एका 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गजानन मालजलकर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गजानन यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिथे त्यांना मृत झाल्याचं डॉक्टरांननी घोषित केलं.

मॅरेथॉनमध्ये धावण्याच्या वेळी इतर दोन धावपट्टूंना हृदयविकाराचा झटका आला. पण त्यापैकी एकाला रुग्णालयात दाखल केले आहे तर दुसर्‍याला व्यक्तीचा डिस्चार्ज झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये गजानन मालजलकर यांचा मृत्यू झाला आहे. हल्लीच्या तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. यावर जाणून घेऊयात हृदयविकाराचा झटका येताच तात्काळ कोणते उपाय करावे.

जर कुणाला हृदयविकाराचा झटका आला तर अजिबात घाबरून न जाता हे पाच उपाय जर तुम्ही केले तर रुग्णाचा जीव वाचू शकतो. महत्वाची गोष्टी म्हणजे रुग्णवाहिका ताबडतोब बोलवा. बहुतांश रुग्णवाहिकांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध राहत असल्यामुळे लगेच त्याच्यावर उपचार सुरू केले जाऊ शकतात.

इतर बातम्या - मुंबई मॅरेथॉनमध्ये 3 धावपटूंना Heart Attack, एकाचा जागीच मृत्यू

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला मळमळतं. अशावेळेस त्या रुग्णाला एका कडेवर वळवा. असं केल्याने त्याला मोकळा श्वास घेता आल्याने त्याची तिव्रता कमी होते. तसंच फुप्फुसांना नुकसान होत नाही.

रुग्णाच्या मानेजवळ हात ठेवून त्याचा पल्स रेट चेक करा. जर तो 60 ते 70 पेक्षा जास्त असेल तर रक्तदाब झपाट्याने वाढतोय आणि रुग्णाची प्रकृती नाजूक आहे असं समजून तात्काळ रुग्णालयात हलवा.

पल्स रेट कमी जास्त होत असेल तर रुग्णाला झोपवून त्याचे पाय वर उचला. यामुळ पायाकडचा रक्तप्रवाह त्याच्या हृदयाकडे वळतो. असं केल्याने त्याला बऱ्यापैकी आराम मिळतो.

इतर बातम्या - ब्युटी पार्लरमध्ये सुरू होती शरीर विक्री, पोलिसांनी 11 तरुणींना रंगेहात पकडलं

रुग्णाला झोपवल्यानंतर त्याचे कपडे जरा सैल करा. अशा परिस्थितीत त्याला जास्त हालचाल करायला लावू नये. रुग्णाने गाडी चालवता कामा नये, तसंच जिने चढणं-उतरणं टाळावं.

असं झाल्यानंतर रुग्णाभोवती जास्त गर्दी करू होणा नाही याची काळजी घ्या. त्याला पुरेशी हवा मिळेल नीट श्वास घेता येईल येची काळजी घ्या. अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट यापैकी कोणतिही एक गोळी रुग्णाला द्यावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 12:35 PM IST

ताज्या बातम्या