मुंबईच्या मुलीने घालवला FAIR & LOVELY चा 'फेअर'; अन् GLOW आला

मुंबईच्या मुलीने घालवला FAIR & LOVELY चा 'फेअर'; अन् GLOW आला

ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीने प्रेरित होऊन या तरुणीने हिंदुस्तान युनिलिव्हरच्या फेअर अँड लव्हलीविरोधात ऑनलाइन याचिका केली होती.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : फेअर अँड लव्हली (fair and lovely) ती फेअर हा शब्द जाऊन आता तिथं ग्लो हा शब्द आला आहे. यापुढे FAIR & GLOW म्हणून ही स्किन क्रिम ओळखली जाईल. वर्णभेदावरून झालेल्या टिकेनंतर  हिंदुस्तान युनिलिव्हर (hindustan Unilever) कंपनीने 45 वर्षांनी आपल्या इतक्या मोठ्या ब्रँडचं नाव बदललं. कंपनीच्या या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं. मात्र याचं खरं श्रेय जातं ते वर्णभेदविरोधी लढा देणाऱ्यांना आणि या लढ्यात महत्त्वाचं योगदान दिलं ते मुंबईतल्या अवघ्या 22 वर्षांच्या तरुणीने.

मुंबईतील चंदना हिरान (Chandana Hiran) तुमच्या-आमच्याप्रमाणेच टीव्ही आणि वर्तमानपत्रात फेअर अँड लव्हलीची जाहिरात पाहत लहानाची मोठी झाली. आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या रंगाचं कौतुक, अभिमान कधी वाटलाच नाही. उलट गोरेपणाचं जास्त आकर्षण वाटलं. मात्र फेअरच लव्हली का असा प्रश्न चंदनाला पडला.

न्यूज 18 शी बोलताना चंदना म्हणाली, "बॉलीवूड फिल्म्स असो, गाणी असो, कविता किंवा एवेंट आर्ट असो कृष्णवर्णीयांचा देश असूनही गौरवर्णालाच भारतात प्राधान्य दिलं गेलं. माझ्यासारखा रंग असलेल्या मुलींच लोकप्रिय संस्कृतीत प्रतिनिधीत्व करणारं असं कुणीच नाही. माझ्यासारखा रंगाची मुख्य अभिनेत्री मला कधी दिसली नाही, माझ्या रंगाचं समर्थन करणारी मॅगझीन किंवा जाहिरात मला कधी दिसली नाही. अगदी सोशल मीडिया आणि फोटो एडिटिंग साइटसवरील फिल्टर्समध्येही तुम्ही गोरं कसं दिसाल यावरच भर दिला जातो"

हे वाचा - FAIR गेला आता फक्त GLOW दिसणार; 45 वर्षांनी हिंदुस्तान युनिलिव्हरचा मोठा निर्णय

यानंतर ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीने चंदना आणखी प्रेरित झाली. फेअर अँड लव्हली वरून चंदनाने HUL विरोधात change.org वर ऑनलाइन याचिका केली. ज्यावर फक्त दोन आठवड्यात तब्बल 15 हजार पेक्षा जास्त लोकांना आपल्या स्वाक्षरी करून त्याला पाठिंबा दिला.

"पाश्चिमात्य देशातील बीएलएम चळवळीला अनेक भारतील सेलिब्रिटींना पाठिंबा दर्शवला. तेव्हा भारतातील वर्णभेदाबाबतही प्रश्न उपस्थित झाले. कारण हे सर्वत्र आहे. फेअर अँड लव्हलीदेखील फेअरच लव्हली असते हे ते आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत होते, असं मला वाटलं त्यामुळे हिंदुस्तान युनिलिव्हरविरोधात याचिका केली आणि हे नाव बदलण्याची मागणी केली. बीएलएम चळवळीमुळेच कंपनीला असं पाऊल उचलण्यास भाग पडलं", असं ती म्हणाली

हे वाचा - घाम आणि दुर्गंधीच नाही तर आता कोरोनालाही शरीरापासून दूर ठेवणार Deodorant

अमेरिकेत वर्णभेदावरून उफाळून आलेल्या वादानंतर जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या स्किन व्हाइटनिंग क्रिमची विक्री बंद करण्याची घोषणा केली त्यानंतर आता हिंदुस्तान युनिलिव्हरनेही हे पाऊल उचललं आहे.

"मी केलेल्या याचिकेतून मला आणखी काही अपेक्षित नाही. शेवटी फेअर अँड लव्हली हे कित्येक वर्षांपासून आहे. मात्र अशा ब्रँडचं नाव बदलणं हे योग्य दिशेनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे", असं चंदना म्हणाली.

संपादन - प्रिया लाड

First published: July 2, 2020, 9:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading