मुंबईकरांची जीवनशैलीच नडली! 77% कोरोनाग्रस्त मृतांना होते इतर आजार

मुंबईकरांची जीवनशैलीच नडली! 77% कोरोनाग्रस्त मृतांना होते इतर आजार

मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू (corona patient death) नेमका कशामुळे झाला याचा ताजा अहवाल जारी करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 04 सप्टेंबर : मुंबईत आतापर्यंत एकूण  7724 कोरोनाग्रस्त (Mumbai coronavirus) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे, याचा अभ्यास करण्यात आला. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं ऑडिट करण्यात आलं. मृत्यूच्या कारणांचा ताजा अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जीवशैलीशी संबंधित आजारांमुळे  77 टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

इतर आजार असलेल्या रुग्णांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे आणि याच आजारांमध्ये कोरोनाव्हायरस झाला तर त्या व्यक्तीला मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे. मुंबईतील मृत्यूच्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट होते आहे. मुंबईत मृत्यू झालेल्या 5800 रुग्णा रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी 77 टक्के रुग्णांना इतर आजार होते.

मुंबईतील 5800  कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीनुसार,

31% मृत्यू - रुग्णालयात 24 तासांच्या आत

59% मृत्यू - रुग्णालयात 4 दिवसांत

77% मृतांमध्ये  - को-मॉर्बीडिटी म्हणजे इतर आजार

कोरोना रुग्णांच्या मृत्यू पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांच्या जीवनशैलीशी संबंधित आजार हेच कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूमागील मोठं कारण आहे.

हे वाचा - कोरोनामुक्त रुग्णाला पुन्हा Covid चा संसर्ग; देशातली पहिलीच केस मुंबईत

वयोमानाचा विचार करता,

वयोगट (वर्षे)      एकूण मृत्यू

0 ते 10                 10

11 ते 20                 32

21 ते 30              101

31 ते 40             325

41 ते 50            806

51 ते पुढील       4536

विशेष म्हणजे ज्या तरुणी किंवा तरुणांमध्ये स्थुलत्व आणि हायपोथायरॉइड असेल त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण या 5800 मृत्यूंमध्ये 21 ते 30 या वयोगटातील 101 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, असं डॉ. सुपे यांनी सांगितलं.

हे वाचा - लस लांबणार! Coronavirus चा विस्फोट होत असतानाच WHO ने दिली वाईट बातमी

एकंदरच मुंबईकरांची जीवनशैली आणि त्यामुळे उद्भवणारे आजार कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमुख कारण आहे. असं या अहवालातून दिसून येतं आहे.

कोरोना संसर्ग पुन्हा होण्याचं देशातील पहिलं प्रकरण मुंबईत

एखाद्या व्यक्तीला एकदा कोरोनाव्हायरस झाल्यानंतर त्याला पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते का? तर आता अशी काही प्रकरणं समोर येऊ लागली आहे. आधी हाँगकाँग आणि आता भारतातही असं प्रकरण दिसून आलं आहे. भारतातही एका व्यक्तीला दोन वेळा कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. देशातील हे पहिलं प्रकरण आहे. देशात Covid-19 चा संसर्ग पुन्हा होण्याचं पहिलं प्रकरण आढळलं आहे ते मुंबईत. मुंबईतील सायन रुग्णालयातील डॉक्टरला पुन्हा कोरोना झाला आहे. सायन रुग्णालयातील अनेस्थिशिया विभागातील ही महिला डॉक्टर आहे, जी दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित झाली आहे.

Published by: Priya Lad
First published: September 4, 2020, 7:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading