अवघ्या आठ दिवसांच्या चिमुरड्याची मृत्यूशी झुंज यशस्वी; गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर जीवनदान

अवघ्या आठ दिवसांच्या चिमुरड्याची मृत्यूशी झुंज यशस्वी; गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर जीवनदान

बाळावर वेळीच उपचार झाले नसते तर तो दगावण्याची शक्यता होती.

  • Share this:

मुंबई, 03 जुलै : आपल्या घरात नवा छोटा पाहुणा आल्यानंतर त्याचा आनंद संपूर्ण कुटुंबाला होतो. असाच आनंद अहमदनगरमधील कुटुंबालाही झाला. त्यांच्या घरी चिमुकला पाहुणा आला. कोरोना काळात या बाळाचा जन्म झाला मात्र बाळ निरोगी होतं. मात्र आठवडाभरानंतर त्याला हृदयदोष असल्याचं निदान झालं. त्याच्यावर गुंतागुंतीची अशी शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचवण्यात आला आहे.

अहमदनगरमधील दाम्पत्याचं हे बाळ. त्याचा जन्म झाला तेव्हा त्याचं वजनही 2.5 किलो होतं. मात्र आठवडाभरात बाळाची प्रकृती खालावली. स्तनपानावेळी  त्याला श्वास घ्यायाला त्रास होत होता. बाळाच्या पालकांनी बाळाला जवळच्या बालरोग तज्ज्ञांकडे नेलं. इकोकार्डियाग्राफी तपासणीत बाळाच्या श्वासाचा वेग वाढत असल्याचं दिसलं. बाळाच्या हृदयाच्या महाधमनीत ब्लॉकेज होतं. सर्वसामान्यपणे बाळाचा हार्ट पंपिंग रेट कमीत कमी 55 टक्के इतका असतो. मात्र या बाळामध्ये फक्त 15 टक्के इतकाच होता. तपासात बाळाला दुर्मिळ असा हृदयदोष असल्याचं समजलं. जो फक्त 2% टक्के बाळांमध्ये दिसून येतो. 25% बाळांमध्ये जन्माच्या 1 महिन्यानंतर ही स्थिती पाहायला मिळते.

हे वाचा - हात चेहऱ्याजवळ जाताच वाजणार अलार्म; NASAचं उपकरण कोरोनाला दूर ठेवण्यात मदत करणार

त्यानंतर बाळाला मुंबईतील जेरबाई वाडिया रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं. बाळाला त्वरित आयसोलेशन युनिटमध्ये दाखल करण्यात आलं. त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवलं. बाळावर बलून एओर्टिक वाल्वोटॉमी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. ही जोखमीची शस्त्रक्रिया 2 तास चालली. त्यानंतर इकोकार्डिओग्राफीने हृदय पंपिंग क्षमतेत त्वरित लक्षणीय सुधारणा दर्शविली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून बाळाला नव्याने जीवनदान मिळाले.

बाळाचे वडील म्हणाले, "आमच्या बाळाला हृदयदोष असल्याचे निदान झाले तेव्हा आम्हाला मोठा धक्का बसला. त्याला तातडीने उपचार मिळाले नसते तर आम्ही आमच्या बाळाला गमावलं असतं. मात्र डॉक्टरांनी आमच्या बाळाला वाचवलं आता तो पुन्हा घरी कधी येतो, याची प्रतीक्षा आम्हाला आहे"

हे वाचा - सामान्य म्हणून डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको; कित्येक आजारांचं आहे हे लक्षण

बाळाला रुग्णालयात आणलं तेव्हा त्याची आणि त्याच्या आईची कोरोना चाचणी करण्यात आली.  बाळाची कोविड चाचणी नकारात्मक होती. मात्र आईची सकारात्मक चाचणी झाली आणि तिला आयसोलेशनसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवलं तर बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. बाळाला लवकरच घरी सोडलं जाणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

संपादन - प्रिया लाड

First published: July 3, 2020, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading