फक्त गॅस, हवेच्या मदतीने महिलेने दिला 5 किलो बाळाला जन्म; टाक्यांचीही पडली नाही गरज

फक्त गॅस, हवेच्या मदतीने महिलेने दिला 5 किलो बाळाला जन्म; टाक्यांचीही पडली नाही गरज

हिप्नोबर्थिंग टेक्निकचा वापर करत या महिलेने बाळाला जन्म दिला आहे.

  • Share this:

लंडन, 25 जून : सिझेरियन, नॉर्मल डिलीव्हरी आपणा सर्वांना माहितीच आहे. आता तर वॉटरबर्थ डिलीव्हरीबाबतही आपल्या माहिती झालं आहे. पण गॅस आणि हवेच्या मदतीने डिलीव्हरी हा काय प्रकार आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. लंडनमधील एका महिलेने फक्त गॅस आणि हवेच्या मदतीने घरच्या घरी बाळाला जन्म दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे हे बाळाचं वजन तब्बल 5 किलो आहे. तरी या महिलेला टाक्यांची गरज पडली नाही.

द सनच्या रिपोर्टनुसार, 34 वर्षांच्या एमा फियरची डिलिव्हरी होणार होती, तेव्हा लॉकडाऊन होतं आणि त्यामुळे ती रुग्णालयात जाऊ शकत नव्हती. तेव्हा तिनं घरच्या घरीच आपली डिलीव्हरी करण्याचा निर्णय घेतला. एमाने घरच्या घरी उपलब्ध असलेल्या सामानाची मदत घेतली. मात्र डिलीव्हरीदरम्यान असह्य अशा वेदना होतात, ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही आणि याच वेदना कमी करण्यासाठी तिने हिप्नोबर्थिंग (hypnobirthing) पद्धतीचा अवलंब केला.

हे वाचा -आई-वडिलांनी एका क्षणात गमावली 2 मुलं, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

हिप्नोबर्थिंग ही बाळाला जन्म देण्याची प्रक्रिया आहे. ज्यामध्ये नॉर्मल डिलीव्हरीला प्रोत्साहन मिळतं. प्रसूतीदरम्यान वाटणारी भीती आणि होणाऱ्या प्रसव वेदना यावर स्वत:च मात करण्याची ही एक पद्धत आहे. श्वासोच्छवास, सकारात्मक विचार आणि व्हिज्युअलायझेन याचा अवलंब केला जातो. एमानेही याच पद्धतीने आपली यशस्वी डिलीव्हरी केली.

तिला डिलीव्हरीवेळी समस्याही होत होती. कारण तिच्या बाळाचं वजन खूप होतं. तब्बल 5 किलो वजनाचं हे बाळ. मात्र तरी एमा हिंमत हरली नाही. तब्बल अडीच तास बाळ बाहेर येण्यासाठी जोर देत राहिली. त्यावेळी तिच्या पतीनेही तिला मदत केली, तिचं मनोबल वाढवलं. हिपनोबर्थिंग टेक्निक यशस्वी झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे प्रसूतीनंतर एमाला टाक्यांचीही गरज पडली नाही.

हे वाचा - Fair & Lovely तून 'फेअर' होणार गायब; 45 वर्षांनी कंपनीने घेतला मोठा निर्णय

एटिकस असं या बाळाचं नाव ठेवण्यात आलं आहे. एमाचं हे तिसरं मूल आहे. 'डिलीव्हरीवेळी अडचण आली मात्र जेव्हा बाळ हातात आलं तेव्हा मी खूप आनंदी झाले', असं एमाने सांगितलं.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 25, 2020, 8:18 PM IST

ताज्या बातम्या