Valentine Day: काका म्हणणाऱ्या 24 वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीशी जिनांनी केलं होतं लग्न

Valentine Day: काका म्हणणाऱ्या 24 वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीशी जिनांनी केलं होतं लग्न

एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच मोहम्मद अली जीना यांची प्यारवाली लव्ह स्टोरी आहे.

  • Share this:

दोघांच्या वयामध्ये तब्बल 24 वर्षाचं अंतर. एक मुस्लिम तर  एक पारसी. समाजावर जातीव्यवस्थेचा जबरदस्त पगडा. अल्पवयीन वय आणि मुलीच्या घरातून होणारा प्रचंड विरोध. शिवाय दोन वर्षाचा विरह. अशीच काहीशी एखाद्या चित्रपटाला शोभवी अशी ही 'लव्ह स्टोरी' आहे मोहम्मद अली जीनांची !

रूटी, मुंबईतील श्रीमंतांपैकी एक असलेल्या दिनशॉ यांची मुलगी. ती देखील 'एकुलती एक'! वयाची 18 वर्षे पूर्ण होताच रूटीनं मोहम्मद अली जीनाशी लग्न केलं आणि जातीव्यवस्थेचा जबरदस्त पगडा असलेला भारतीय समाज हादरून गेला. प्रत्येकाच्या तोंडी एकच विषय होता. रूटी आणि मोहम्मद अली जीनांचं लग्न ! 19 एप्रिल 1918 रोजी मोहम्मद अली जीना यांनी रूटीशी दुसरा विवाह केला आणि आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली. पण, त्यानंतर दोघांच्या आयुष्यात आलेली वादळं देखील काही केल्याची शमण्याचं नाव घेत नव्हती. ह्रद्य हेलावून टाकणाऱ्या चित्रपटाप्रमाणेच यांच्या 'लव्ह स्टोरीचा दी अँड' झाला होता.

जीनांचा लग्न न करण्याचा निर्धार

वयाच्या 16व्या वर्षी मोहम्मद अली जीना यांचा 14 वर्षाच्या एमिबाई यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर वकिलीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जीना लंडनला गेले. त्याच वेळी त्यांना एमिबाईंच्या मृत्यूची बातमी कळली. यानंतर जीना यांना लग्न न करण्याचा निर्धार केला. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. कारण, जीनांच्या आयुष्यात नव्यानं प्रेम परतणार होतं. एमिबाई यांच्या मृत्यूनंतर जीनांची बहिण फातिमानं दुसरं लग्न करण्यासाठी तगादा लावला. पण, 'आता लग्न नाही' असा निश्चय जीनांनी बोलून दाखवला.

प्यार के ‘वो लम्हे’

काका – काका म्हणत जीनांच्या अवती – भोवती फिरणारी रूटी टपोरे डोळे आणि वागण्या – बोलण्यात असलेला आत्मविश्वासामुळे सर्वांमध्ये उठून दिसत होती. रूटीचे वडील दिनशॉ आणि जीनांमध्ये मुंबईतील क्लबमध्ये ओळख झाली आणि या ओळखीचं रूपांतर मैत्रित. त्याच वेळी देशाच्या राजकारणात मोहम्मद अली जीना हे नाव नावारूपाला येत होतं.

याच मैत्रीखातर करोडपती दिनशॉंनी मोहम्मद अली जीनांना 'माझ्या कुटुंबासह दार्जिंलिंगला फिरायला चला' असा आग्रह केला. जीनांनी देखील हसत मुखानं दिनशॉ यांचं आमंत्रण स्वीकार केलं.

दार्जिंलिंगच्या हवेत गारवा होता. याचवेळी जीना – रूटी यांचं प्रेम बहरत होतं. वयाचं भान न राहता जीना आणि रूटी एव्हाना एममेकांच्या प्रेमात आकांत बुडाले होते. अखेर दोघांनी देखील आपल्या प्रेमाबद्दल घरी सांगण्याचं ठरवलं. पण, प्रश्न हा होता की, घरच्यांना हे नातं मंजूर असेल?

विरहाचा आणि कसोटीचा क्षण

मोहम्मद अली जीना यांनी दिनशॉ यांच्या समोर अखेर आपल्या प्रेमाची कबुली दिली. पण, कानात शिळा रस ओतावा त्या प्रमाणे दिनशॉ यांच्या कानात जीनांचे शब्द घुसले. परिणामी, रागाने लाल झालेल्या दिनशॉ यांनी 'चालते व्हा' असा आदेशच दिला. जीनांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण, रागानं लालबुंद झालेले दिनशॉ काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. दिनशॉ यांची मनधरणी करण्यामध्ये जीना पूर्णपणे फोल ठरले होते.

यानंतर दिनशॉ यांनी रूटीला जीनांना भेटता येणार नाही अशा शब्दात स्पष्ट ताकीद दिली. पण, बंडखोर असलेल्या रूटीनं मात्र वडिलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत जीनांशी लग्न करण्याचा निर्धार बोलून दाखवला. त्यानंतर रूटीवर अनेक बंधनं आली. पण, परिस्थितीसमोर, घरच्यांसमोर नमतं न घेता रूटीनं दोन वर्ष जीनांची वाट पाहिली.

अखेर तो दिवस उजाडला

20 फेब्रुवारी 1918. दोघांच्या आयुष्यातील तो दिवस अखेर उजाडला. या दिवशी रूटीनं 18 वर्षे पूर्ण केली होती. त्या दिवशी रूटीनं वडिलांच्या विरोधात जात मुस्लिम धर्माचा स्वीकार करत मरियम असं नामकरण केलं. त्यानंतर दोघांनी 19 एप्रिल 1918 रोजी 'निकाह' केला. भारतीय जाती व्यवस्थेला हा खूप मोठा हादरा होता.

'प्यार वाली लव्ह स्टोरी'चा अंत

रूटी स्वभावानं बंडखोर होती. शिवाय जीना आणि रूटीचं वागणं देखील परस्पर विरोधी होतं. दोघांमध्ये वयाचं अंतर देखील होतंच. लग्नानंतर काही दिवसांनी रूटी आणि जीनांमध्ये कडाक्याची भांडणं होऊ लागली. जीनांनी मनाई केल्यानंतर देखील रूटी आपला हेका सोडायला तयार नव्हती. रूटीच्या बंडखोरीचे आणि स्वभावाचे अनेक किस्से आजही प्रसिद्ध आहेत.

दरम्यान, भांडणांमुळे वैवाहिक आयुष्यात वादळं निर्माण झाली. त्यामुळे दोघांमध्ये अंतर देखील पडलं. याच काळात रूटी नशेच्या आहारी गेली. त्याचा परिणाम ऐवढा मोठा झाला की रूटीला उपचारांसाठी लंडनला हलवावं लागलं. उपचारानंतर रूटी हॉटेल ताजमध्ये राहायाला लागली. अखेर 20 फेब्रुवारी 1929 या दिवशी वयाच्या 30व्या रूटीनं जगाचा निरोप घेतला.

रूटी आणि जीनांच्या प्रेमाचं प्रतिक

रूटी आणि जीनांना लग्नानंतर मुलगी झाली होती. डिनो असं जीना – रूटीच्या मुलीचं नाव. जीनांच्या विरोधात जात डिनोनं नुस्ली वाडियांच्या वडिलांशी लग्न केलं. शिवाय, फाळणीनंतर देखील पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. त्यामुळे रागवलेल्या जीनांनी आयुष्यभर डिनोचं तोंड न पाहण्याची शपथ घेतली. पण, जीनांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र डिनो पाकिस्तानला गेली आणि जीनांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन देखील घेतलं.

First published: February 14, 2019, 7:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading