मुंबई, 10 सप्टेंबर : महेंद्र सिंग धोनीची (MS Dhoni) मुलगी झिवा (Ziva) हिच्या Instagram पेजवरून एक व्हिडीओ viral झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी हातामध्ये धोनीचं चित्र असलेला पोस्टर घेऊन उभी आहे. महेंद्र सिंग धोनीची मुलगी झिवा सिंग धोनी ही देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. धोनीची पत्नी साक्षी सतत काहींना काही झिवाचे फोटो अथवा व्हिडीओ हि इंस्टाग्रामवर अपलोड करत असते. आता जो व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे तो झिवा हिच्या इंस्टाग्राम पेज वरून वरून पोस्ट करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये साक्षी विचारते की, हे कोण आहेत? झिवाला पुन्हा एकदा प्रश्न विचारला जातो कि तुला खात्री आहे की हे तुझेच पपा आहेत ? त्यावर ती यावेळी बोलते महेंद्र सिंग धोनी. पपाची सर्वात मोठी फॅन असे व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे.
झिवाच्या पेजच्या बायोमध्ये असे नमूद केले आहे की, हे पेज तिची मम्मा @sakshising r आणि पापा @महि 7781 हे मॅनेज करत आहेत.
गेल्या महिन्यात झिवाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोन व्हिडीओ प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये ती हिरव्या रंगाच्या सरड्याच्या खेळण्याबरोबर बोलताना दिसून येत होती. त्या फोटोला सरड्या बरोबर एक भेट ! अशी कॅप्शन होती.
जून महिन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या इंस्टाग्राम वरून धोनी झिवाला बाईक वरून फिरवत आहे असा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये धोनीने आपल्या मुलीला पुढे पेट्रोल टॅंकवर बसवलं आहे.
दरम्यान, आयपीएलसाठी धोनी चेन्नईच्या संघाबरोबर दुबईमध्ये दाखल झाला असून त्याचे फॅन्स त्याचा खेळ बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत.19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या संघामध्ये पहिला सामना होणार आहे. याआधी धोनी जुलै महिन्यात भारतीय संघाकडून वर्ल्ड्ककपमध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता.