आता सॅनिटायझरप्रमाणे Mouthwash देखील कोरोनाव्हायरसपासून करणार बचाव

आता सॅनिटायझरप्रमाणे Mouthwash देखील कोरोनाव्हायरसपासून करणार बचाव

क्लोरहेक्सिडीन माऊथवॉश (chlorhexidine mouthwash) कोरोनाव्हायरसपासून संरक्षण देऊ शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जून : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी आपण मास्क लावत आहोत, कुठेही जाताना सॅनिटायझर सोबत ठेवत आहोत. मात्र आता सॅनिटायझरप्रमाणे माऊथवॉशदेखील (Mouthwash) तुमचा कोरोनाव्हायरसपासून बचाव करणार आहे. क्लोरहेक्सिडीन माऊथवॉश (chlorhexidine mouthwash) कोरोनाव्हायरसपासून संरक्षण देऊ शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

कोरिया युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसीनच्या (Korea University College of Medicine) शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्नल ऑफ कोरियन मेडिकल सायन्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

लाळेमध्ये कोरोनाव्हायरस भरपूर प्रमाणात असल्याचं अभ्यासात दिसून आलं आहे. त्यामुळे एखादी कोरोनाग्रस्त व्यक्ती बोलत असेल तेव्हा तिच्या समोरच्या व्यक्तीपर्यंत कोरोनाव्हायरस पोहोचू शकतो. सध्या काही प्रकरणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणंही दिसत नाहीत. अशावेळी कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी माऊथवॉशची मदत होऊ शकते. क्लोरहेक्सिडीन माऊथवॉथमुळे काही तास लाळेतील कोरोनाव्हायरसचं प्रमाण कमी होऊ शकतं, असं संशोधकांनी सांगितलं.

हे वाचा - तुम्ही घरच्या घरीही बनवू शकता हँड सॅनिटायझर; कसं ते वाचा

10 मिली क्लोरहेक्सिडीन माऊथवॉशने 30 सेकंद गुळण्या केल्याने लाळेतील व्हायरसचं प्रमाण 2 तासांसाठी कमी होतं. ज्यामुळे व्हायरसच्या संक्रमणाचा धोका कमी होतो, असं शास्त्रज्ञ म्हणालेत.

त्यामुळे डॉक्टर, रुग्ण, होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्ती, कामानिमित्त घराबाहेर पडणारे लोक आणि प्रवास करणाऱ्यांनी नागरिकांनी दर 2 तासांनी या माऊथवॉशचा वापर करावा. शिवाय डेंटिस्ट, ईएनटी, ऑप्थमोलॉजी आणि जनरल फिजिशिअन्सनीदेखील त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना माऊथवॉशने गुळण्या करून येण्यास सांगावं. जेणेकरून किमान दोन तास करी कोरोनाव्हायरस संक्रमणचा धोका कमी असेल, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.

हे वाचा - नाक-तोंड मास्कने झाकलात; तरी 'या' भागातून कोरोना शरीरात जाण्याचा धोका

35 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत असलेली आयसीपीए हेल्थ प्रोडक्ट लिमिटेड (ICPA Health Products Ltd) ही भारतीय कंपनी अशा प्रकारचं माऊथवॉश तयार करते.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 9, 2020, 7:06 AM IST

ताज्या बातम्या