Home /News /lifestyle /

Tips To Get Rid Of Bad Breath: तोंडाच्या दुर्गंधीमुळं चारचौघात अडचण होते ना? हे सोपे उपाय तुमच्या आहेत फायद्याचे

Tips To Get Rid Of Bad Breath: तोंडाच्या दुर्गंधीमुळं चारचौघात अडचण होते ना? हे सोपे उपाय तुमच्या आहेत फायद्याचे

Tips To Get Rid Of Bad Breath: तोंडातून दुर्गंधी येण्याची अनेक कारणं असू शकतात. यामध्ये आतड्यांमध्ये अन्न सडणं, अयोग्य पचन, बद्धकोष्ठता, पायोरिया आणि दातांसंबंधी सर्व समस्यांचा समावेश आहे.

    नवी दिल्ली, 10 डिसेंबर :  तोंडाची दुर्गंधी (Bad Breath) ही अशी समस्या आहे की, त्यापासून प्रत्येकाला सुटका हवी असते. पण क्वचितच कोणी यावर उपचार करू इच्छितो. लोक आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही समस्या अधिक गांभीर्यानं घेत नाहीत, हे याचं मुख्य कारण आहे. मात्र, तोंडाच्या दुर्गंधीमुळं लोकांमध्ये वावरताना त्यांना लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होत असल्यानं ते या समस्येवर मात करण्यासाठी ते घरगुती उपाय शोधत असतात. आज आम्ही तुम्हाला या समस्येवर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगत आहोत. तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय उत्तम प्रकारे (Tips To Get Rid Of Bad Breath) काम करतील. तोंडातून दुर्गंधी येण्याची अनेक कारणं असू शकतात. यामध्ये आतड्यांमध्ये अन्न सडणं, अयोग्य पचन, बद्धकोष्ठता, पायोरिया आणि दातांसंबंधी सर्व समस्यांचा समावेश आहे. यापैकी कोणत्याही समस्येमुळं तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीनं तुम्ही त्रस्त असाल तर हे घरगुती उपाय तुमच्यासाठीखूप उपयोगी ठरू शकतात. त्यांच्याबद्दल (Mouth Fresh Tips) जाणून घेऊया. पेरूची पानं चावून चावून चघळावीत श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही पेरूची पानं चघळू शकता. तसंच, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेरूची पाने पाण्यात उकळून या पाण्यानं चुळा भरू शकता किंवा गुळण्या करू शकता. डाळिंबाची साल वापरा श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही डाळिंबाच्या सालीचाही वापर करू शकता. यासाठी डाळिंबाची साल पाण्यात उकळून या पाण्यानं चुळा भराव्यात किंवा गुळण्या कराव्यात. कोरडे धणे चघळणं श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही कोरड्या धण्यांचा माउथ फ्रेशनर म्हणून वापर करू शकता. यासाठी अर्धा चमचा कोरडे धणे घेऊन ते एका बडीशेपप्रमाणे तोंडात ठेवा आणि चघळत राहा. तुम्ही दिवसातून दोन-तीन वेळा हा उपाय करू शकता. हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत मोहरीच्या तेलाने मालिश करा तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात थोडं मीठ मिसळून दात आणि हिरड्यांना मसाज करा. यासाठी अर्धा चमचा मीठ घेऊन त्यात दोन-तीन थेंब मोहरीचे तेल मिसळा. यानंतर बोटाच्या साहाय्यानं दातांना आणि हिरड्यांना हलक्या हातानं मसाज करा. लवंगा चघळणं लवंग केवळ दातदुखीपासून आराम देत नाही. तर, यामुळं श्वासाची दुर्गंधी दूर होण्यासही मदत होते. यासाठी दिवसातून दोन-तीन वेळा एक किंवा दोन लवंगा तोंडात ठेवून चघळत राहा. हे वाचा - Protein rich foods: तुम्हाला माहीत आहे का? अंड्यापेक्षा जास्त प्रथिने या शाकाहारी पदार्थांमधून मिळतात बडीशेप खा बडीशेप खाल्ल्यानं श्वासाची दुर्गंधी देखील दूर होते. बडीशेप तुम्ही दिवसातून अनेक वेळा माऊथ फ्रेशनर म्हणून वापरू शकता. विशेषतः जेवणानंतर. यामुळे तोंडाची दुर्गंधी तर दूर होईलच. शिवाय, तुमची पचनक्रियाही चांगली होईल. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या