Moto G8 Plus मोबाईल लाँच! जाणून घ्या काय आहेत फिचर्स

Moto G8 Plus मोबाईल लाँच! जाणून घ्या काय आहेत फिचर्स

motoचा नवीन फोन लाँच, Moto G8 Play, vanilla Moto G8, Moto E6 Play मोबाईल लवकरच बाजारात येणार.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर: Moto मोबाईल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. Moto चं पुढचं वर्जन असलेला Moto G8 Plus मोबाईल गुरुवारी ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आला. Moto G7 Plus मोबाईलचं अपडेट आणि पुढची पीढी म्हणून या मोबाईलकडे पाहिलं जातं. या मोबाईलच्या किमतीबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र Moto G7 Plus फोनच्या तुलनेत याची किंमत अधिक असणार आहे. यासोबतच Moto G8 Play, vanilla Moto G8, Moto E6 Play असे तीन नवीन मोबाईलही लाँच करण्यात येणार आहेत.

Moto G8 Plus मोबाईलच्या किमतीबाबत सध्या कोणती माहिती मिळाली नाही. मात्र याआधीचे मॉडेल्स पाहता साधारण Moto G plus ची किमत 23, 600 रुपये होती. त्यातुलनेचा विचार करता यापेक्षा Moto G8 Plusची किंमत नक्कीत जास्त असण्याची चिन्हं आहेत.

Moto G8 Plus मोबाईलचे काय आहेत स्पेसिफिकेशन

हालियाच्या अहवालानुसार स्पेसिफिकेशनचा विचार केला तर हा स्मार्टफोन एन्ड्रॉइड 9वर चालेल. यामध्ये 6.3 इंच फुल स्क्रिन एचडी डिस्प्ले ज्यामध्ये (1080x2280 पिक्सल)IPS डिस्प्ले मिळेल. या मोबाईलमध्ये 665 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम 128 जीबी इनबिल्ड स्टोरेज मिळू शकतं.

या फोनमध्ये युझर्सना तीन कॅमेरे मिळणार आहेत. एक ग्रेडिएंट बॅक पॅनल, एक वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. याशिवाय या मोबाईलमध्ये 4000mha बॅटरी मिळणार आहे. 3.5 एमएस ऑडियोची सुविधा असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 10:57 AM IST

ताज्या बातम्या