मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'या' स्मार्टफोनवर भरघोस सवलत; सेलमध्ये मिळेल 2 हजारांचा डिस्काउंट

'या' स्मार्टफोनवर भरघोस सवलत; सेलमध्ये मिळेल 2 हजारांचा डिस्काउंट

Smartphone

Smartphone

या फोनची किंमत 16,999 रुपये आहे; मात्र एक्स्चेंज ऑफरमध्ये ग्राहकांना 2 हजार रुपयांची सवलत मिळणार आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 26 मार्च :    अनेक मोबाइल कंपन्यांनी आता 5G मॉडेल्स बाजारात आणली आहेत. मोटोरोला कंपनीनेही एक नवा स्मार्टफोन लाँच केलाय. मोटो G 73 हा लेटेस्ट 5G फोन 16 मार्च पासून सेलमध्ये उपलब्ध झाला आहे. दुपारी 12पासून हा सेल सुरू झालाय. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि पॉवरफुल बॅटरी आहे. फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी हा उत्तम मोबाइल आहे. या सेलमध्ये ग्राहकांना 2 हजार रुपयांची सवलत मिळेल. त्यामुळे ब्रँडेड फोन स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळू शकेल.

  मोटो G73 हा 5G फोन आज (16 मार्च) पहिल्यांदाच सेलमध्ये उपलब्ध होतो आहे. दुपारी 12 वाजल्यापासून हा सेल सुरू झालाय. या फोनची किंमत 16,999 रुपये आहे; मात्र एक्स्चेंज ऑफरमध्ये ग्राहकांना 2 हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. त्याशिवाय Axis, HDFC, ICICI आणि SBI या बँकांच्या कार्डवरून खरेदी केल्यास 3,167 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवरही हा फोन मिळू शकतो.

  हेही वाचा - कुठेच नोकरी मिळाली म्हणून त्याने चक्क स्कूटरवरच टाकले फास्टफूड दुकान, VIDEO

  या फोनची फीचर्सही खूप आधुनिक आहेत. फोनला 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. डिस्प्लेचं रिझोल्युशन 1080X2400 पिक्सेल असं आहे. रिफ्रेश रेट 120HZ चा आहे. या फोनमध्ये ऑक्टा कोअर MediaTech Dimensity 930 Soc चिपसेट आहे. या फोनची रॅम 8 जीबी असून, तर स्टोरेज 128 जीबी आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकतं. या फोनमध्ये अँड्रॉइड 13 वर आधारीत ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हा फोन अँड्रॉइड 14 ला अपग्रेडही केला जाऊ शकेल. युझर्सना या फोनवर 3 वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्सही दिले जातील.

  या मोटोरोला फोनमध्ये f/1.8 अ‍ॅपर्चरचा 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेऱ्यामध्ये f/2.4 अ‍ॅपर्चरसोबत 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असेल. या फोनमध्ये 5000 mAhची बॅटरी आहे. 30w च्या टर्बोपॉवर चार्जिंगद्वारे हा मोबाइल फास्ट चार्ज होऊ शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, वाय-फाय, ब्लू-टूथ 5.3, एफएम रेडिओ, जीपीस/ए-जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 mm हेडफोन जॅक या फोनमध्ये आहे. हा फोन 161.42mm लांब व 73.84mm रुंद आहे. या फोनची जाडी 8.29mm इतकी आहे, तर वजन 181 ग्रॅम आहे.

  फ्लिपकार्ट व इतर रिलायन्स डिजिटलसारख्या काही रिटेल स्टोअर्समध्ये हा सेल सुरू आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांना आणखीही काही सवलती उपलब्ध होऊ शकतात. मोटो G73 हा फोन घ्यायचा असेल, तर आजच्या सेलद्वारे भरपूर सवलत मिळू शकते, असं एएनआयच्या बातमीत म्हटलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Tech news, Technology