• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • सासूबाईने वाट लावली! लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली

सासूबाईने वाट लावली! लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

सासूला पाहताच नवरीला मोठा धक्का बसला.

 • Share this:
  ब्रिटन, 22 सप्टेंबर : लग्न (Wedding) म्हणजे प्रत्येक तरुणीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. यासाठी किती तरी दिवसांपासून ती तयारी करत असते. लग्नात आपण सुंदर आणि हटके (Bride) दिसावं यासाठी ती सर्व काही करते. लग्नाची इतकी तयारी केल्यानंतर ऐन लग्नातच कुणी दुसऱ्याने काहीतरी प्रताप केला तर राग येणं साहजिकच आहे. असाच अनुभव एका महिलेने मांडला आहे. तिच्या लग्नाची वाट लावणारं दुसरं तिसरं कुणी नाही तर चक्क तिची सासूच (Mother-In-Law) होती. नवरीबाईच्या (Daughter-In-Law) सासूने लग्नातच असं काही केलं की नवरी संतप्त झाली. ऐन लग्नात सासून आपला प्लॅन बदलला आणि नवरीबाई भडकली. आता या सासूने नेमकं केलं तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. रेडिटवर या महिलेने आपल्या लग्नाचा हा विचित्र किस्सा सांगितला आहे. हे वाचा - तिच्या Undergarments मुळे उद्ध्वस्त होईल माझा संसार; महिलेची तक्रार, पोलीसही चक्रावले लग्नाआधी कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी कपडे खरेदी करण्यात आले होते. महिलेच्या सासूसाठीही सुंदर ड्रेस घेण्यात आला होता. पण यानंतर तिच्या सासूला आणखी एक आऊटफिट दिसला. मग काय लग्नाच्या दिवशी मध्येच जाऊन सासूने आपला ड्रेस बदलला. जेव्हा ती ड्रेस बदलून पुन्हा लग्नात आली तेव्हा तिला पाहून महिला शॉकच झाली. कारण तिच्या सासून घातलेला ड्रेस अगदी तिने लग्नात घातलेल्या तिच्या ड्रेसशी मिळताजुळता होता. अगदी लग्नाला आलेल्या पाहुण्यांनीसुद्धा नवरी आणि तिच्या सासूचे ड्रेस समान असल्याबाबत म्हटलं.  नवरदेवाच्या आईच्या मते, नवरीसाठी हा दिवस जितका खास होता, तितकाच तिच्यासाठीही होता. त्यामुळे तिचा ड्रेससुद्धा तसाच असायला हवा. नवरीचा राग मात्र आवरला नाही. आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेला इतका दिवस आपल्या सासूने कसा खराब केला? लग्नाच्या फोटोसेसनमध्ये सासू-सून दोघांमध्येही काही खास फरक दिसणार नव्हता. त्यामुळे तिने आपल्या सासूला असं करायला नको हवं होतं, असं म्हटलं. हे वाचा - इथे लग्नातच पाहुणे नवरीसोबत करतात अश्लील गप्पा; खास आहे विचित्र प्रथेचा उद्देश या महिलेने आपल्या लग्नाचा अनुभव आता सोशल मीडियावर मांडला असला तरी तिच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पण तरी  तेव्हापासून ते आतापर्यंत तिची सासू तिला माफी मागायला सांगत आहे. आता मी सासूची माफी मागितली नाही, यात काय चुकीचं केलं, असा प्रश्न तिने नेटिझन्सना विचारला आहे.
  Published by:Priya Lad
  First published: