मुंबई, 04 जानेवारी : आईचा जीव हा तिच्या मुलांमध्येच अडकलेला असतो
(Mother children). मुलं संकटात सापडताच ती आपला जीव धोक्यात घालून त्यांना संकटातून बाहेर काढते. मुलांचा मृत्यू यापेक्षा मोठं दुःख आईसाठी दुसरं कोणतंच नाही. पण एका आईने मात्र आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर आनंद व्यक्त केला आहे
(Mother happy after son death). मी आनंदी आहे, तो गेला कारण... असं म्हणत या महिलेने चिमुकल्या लेकाच्या मृत्यूनंतर भावुक पोस्ट केली आहे.
व्हिटनी फ्रॉस्ट नावाची ही महिला. तिने आपल्या मुलाच्या मृत्यूची माहिती आपल्या सोशल मीडियावर दिली आहे, इन्स्टाग्रामवर तिने भावुक पोस्ट केली आहे. तसंच टिकटॉकवर आपल्या मुलाच्या फोटोंचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने तिच्या 6 वर्षीय मुलगा हॅरिसनचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. मुलाच्या मृत्यूमुळे आपण आनंदी असल्याचं ती म्हणाली.
द सनच्या रिपोर्टनुसार टिकटॉकवर व्हि़डीओत व्हिटनी म्हणाली, हॅरिसनने 3 वाजून 35 मिनिटांनी जगाचा निरोप घेतला. आमचा मुलगा या जगता नाही यावर आम्हाला विश्वासच बसत नाही आहे. पण त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवून मी आनंदी राहते आहे. इतका जास्त आनंदी राहणारा मुलगा मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता.
हे वाचा - भारतीय नारी जगात भारी! फक्त केसांनीच खेचली तब्बल 12,000 किलोची डबल डेकर बस; पाहा VIDEO
कोणती आई आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूमुळे आनंदी होईल. पण ही महिला त्याला अपवाद ठरली आहे आणि याचं कारणही तसंच आहे. तिच्या मुलाला इन्फँटाइल न्यूरोएक्सोनल डिस्ट्रोफी होतं.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोकच्या माहितीनुसार INAD हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामुळे एक्सोनवर परिणाम होतो. एक्सोन हा एक नर्व्ह सेलचा भाग असतो जो व्यक्तीच्या मेंदूतील संदेश शरीराच्या इतर भागापर्यंत पोहोचवतो. या आजारामुळे दृष्टी, मांसपेशी आणि मानसिक आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. यावर कोणताच उपचार नाही.
हे वाचा - चक्क सिंहाला महिलेने कुशीत घेतलं आणि...; CCTV कॅमेऱ्यात कैद झालं Shocking दृश्य
व्हिटनीने सांगितलं, हॅरिसन असा कायमचा निघून गेल्याने आम्ही खचलो आहोत. पण तो आता वेदनेत नाही याचा आम्हाला आनंद आहे. तो खूपच लवकर निघून गेला. यामुळे त्याला जास्त त्रासही झाला नाही. बऱ्याच कालावधीपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. पण त्याच्या आरोग्यावर काहीच परिणाम दिसत नव्हता. आपण आतून पूर्णपणे कोलमडलो आहोत. पण आपल्या आणखी दोन मुलांसाठी मजबूत बनावं लागेल असं तिने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.