Home /News /lifestyle /

Dandruff : काही केल्या डोक्यातील कोंडा जातच नाही ना? तुमच्या स्वयंपाक घरात लपलाय जालीम उपाय

Dandruff : काही केल्या डोक्यातील कोंडा जातच नाही ना? तुमच्या स्वयंपाक घरात लपलाय जालीम उपाय

Home Remedies Dandruff : केसातील कोंडा नाहीसा होण्यास बराच वेळ लागतो. कधीकधी वर्षानुवर्षे केसांमधील कोंडा कमीच होत नाही. केसांच्या छिद्रांमध्ये अडकून केस कमकुवत करण्यास तो कारणीभूत ठरतो.

    मुंबई, 01 जानेवारी : केसांमध्ये एकदा कोंडा (Dandruff) होऊ लागला, की तो सहजासहजी कमी होत नाही. केसातील कोंडा नाहीसा होण्यास बराच वेळ लागतो. कधीकधी वर्षानुवर्षे केसांमधील कोंडा कमीच होत नाही. केसांच्या छिद्रांमध्ये अडकून केस कमकुवत करण्यास तो कारणीभूत ठरतो. कोंडा घालवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने आहेत, ती वापरल्यानंतरही कोंडा जाईल याची काही खात्री नसते. तुम्ही केसांमध्ये औषधे वापरता, तेव्हा आपल्याला इतर नुकसान म्हणजेच साईड इफेक्टही होऊ शकतात. अशा परिस्थितीत आज आपण दोन अतिशय प्रभावी घरगुती उपाय जाणून घेऊयात, ज्याचा अवलंब करून तुम्ही केसांमधील कोंडा (Home Remedies Dandruff) घालवू शकता. 1. कांद्याचा रस केसांच्या या समस्येवर मात करण्यासाठी कांद्याचा रस खूप प्रभावी मानला जातो. डोक्यातील कोंड्यावर इलाज करून कंटाळला असाल तर आता निराश होण्याऐवजी स्वयंपाकघरात जा आणि मिक्सरमध्ये कांदा बारीक करून घ्या. चाळणीत चांगला गाळून एका भांड्यात ठेवा. कापसाच्या मदतीने हा रस धुतलेल्या आणि वाळलेल्या केसांच्या मुळांवर लावा आणि 20 मिनिटं कोरडं होऊ द्या. यामुळे तुमचे केस निरोगी आणि मजबूत होतील. जर तुमचे केस लांब असतील तर केसांनाही लावा आणि केस बांधा. 20 मिनिटांनंतर स्वच्छ धुवा. तुम्ही हे आठवड्यातून दोन दिवस करा. आठवड्याभरात केसांमधील कोंडा दूर होईल आणि केस गळणेही थांबेल. हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का? 2 .तांदळाचे पाणी केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी आणि त्यांची चमक वाढवण्यासाठी तुम्ही तांदळाचे पाणी वापरू शकता. तुम्ही एका कप तांदळात 4 कप पाणी टाका आणि उकळा. 10 मिनिटांनी गॅस बंद करून तांदूळ गाळून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर केसांच्या मुळांना लावा. 3 तास केसांना लावून ठेवा. तुम्ही शॅम्पू केल्यानंतरही वापरू शकता. तीन तासांनंतर साध्या पाण्याने केस चांगले धुवा, आठवड्यातून किमान 3 वेळा ही पद्धत वापरून पहा. तुम्हाला दोन वेळा लावल्यानंतरच फरक दिसू लागेल. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Woman hair

    पुढील बातम्या