मुंबई, 06 जुलै : पावसाळा म्हटलं की आपल्याला खूप आनंद होतो पण त्याचबरोबर काळजीही वाटते ती म्हणजे डासांची आणि डासांमुळे होण्याऱ्या आजारांची. कारण पावसाळ्यात डासांची पैदास खूप झपाट्याने होत असते.त्यामुळे आपण पावसात डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी तऱ्हेतऱ्हेची लिक्विड, कॉईल आणि मच्छरदाणीचा वापर करतो. इतके उपाय करूनही ताप, इनफेक्शन, सर्दी-खोकला, मलेरिया, डेंगूसारखे आजार होतातच. पण आता घाबरण्याची किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी काही खास घरगुती उपाय आहेत. पाहूयात कोणते आहेत हे खास उपाय?
1. स्वयंपाकघरात रोजच्या वापरात असलेला लिंबू कापून आपल्या शेजारी ठेवल्यास आजूबाजूला असलेले डास पळून जातात.
2. त्याचप्रकारे खोबरेल तेलात खोडी लवंग मिसळून त्वचेवर लावल्यास डास चावण्याची भीती नसते.
3.4 ते 7 तुळशीच्या पानांचा रस लावल्यास डास चावत नाहीत.
4. संत्र्याच्या सुकवलेल्या साली कोळश्यावर भाजल्यास त्या वासाने डास नाहीसे होतात.
5. तसेच लिंबू मध्यभागी कापून त्यावर लवंग लावल्यामुळे डास जवळपास फिरकतही नाहीत.
6. बरेच जण संध्याकाळ झाली की डास येऊ नयेत म्हणून ऑल आऊट लावतात, तीच ऑल आऊटची बाटली रिकामी झाल्यास त्यामधे कडुलिंबाचे तेल आणि कापूर घालून ती लावा. असे केल्याने डास घरात येणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: All out, Mosquitoes, People, Remedies, आॅल आऊट, उपाय, डास