Home /News /lifestyle /

आता डास चावल्यानंतरही नो टेंशन...स्किन क्रिम देणार व्हायरसपासून संरक्षण

आता डास चावल्यानंतरही नो टेंशन...स्किन क्रिम देणार व्हायरसपासून संरक्षण

डेंग्यूसारखा आजार आपल्याला होऊ नये, यासाठी आपल्याला डास चावणार नाही याची काळजी आपण घेतो, त्यासाठी आपण डास चावण्यापासून संरक्षण देणारं Skin लावतो. मात्र डास चावल्यानंतर जर व्हायरसने तुमच्या शरीरात प्रवेश केला, तर त्यामुळे होणाऱ्या आजारापासूनही तुम्हाला स्किन क्रिम संरक्षण देणार आहे.

पुढे वाचा ...
    डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका इत्यादी डासांमार्फत पसरणारे आजार... डास चावल्यानंतर या आजारांचे व्हायरस शरीरात जातात. त्यामुळे आपल्याला डास चावणार नाहीत, याची काळजी आपण घेतो. यासाठी आपण घराबाहेर पडताना शरीरावर Mosquito repellent म्हणजे डास चावणार नाही, असं स्किन क्रिम लावतो. मात्र एकदा का डास चावला आणि शरीरात व्हायरसने प्रवेश केला मग त्यामुळे होणाऱ्या आजारांवर औषधोपचारांशिवाय पर्याय नसतो... पण जर तुम्हाला सांगितलं, की डास चावल्यानंतर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही कारण फक्त तुमच्या त्वचेवर क्रीम लावून तुम्ही होणाऱ्या आजाराला रोखू शकता तर... आश्चर्य वाटलं ना... मात्र युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सच्या संशोधकांनी हे शक्य करून दाखवलं आहे. सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसीनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. संशोधकांनी डासांमार्फत पसरणाऱ्या 4 प्रकारच्या व्हायरसचा अभ्यास केला. डास चावल्यानंतर पसरणाऱ्या व्हायरसवर स्किन क्रिमचा काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी त्यांनी उंदीर आणि मानवाच्या त्वचेचे नमुने घेतले. संशोधकांना दिसून आलं की, तासाभरात जर क्रिम लावली तर डासांमार्फत शरीरात जाणारा व्हायरस शरीरात पसरत नाही. स्किन क्रिम एखाद्या वॉर्निंग सिग्नलप्रमाणे काम करत होती. ज्यामुळे कोणत्याही व्हायरसशी लढण्यासाठी त्वचेची रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने सक्रिय होत होती. यामुळे शरीरात व्हायरस पसरण्यापासून आणि आजार होण्यापासून संरक्षण मिळत होतं. या क्रिमला imiquimod किंवा Aldara असं म्हटलं जातं, ही क्रिम genital warts आणि काही प्रकारच्या त्वचेच्या कॅन्सरवर उपचारासाठी वापरलं जातं. संशोधनाचे मुख्य अभ्यासक डॉ. क्लाइव्ह मॅककेमी म्हणाले, "आमच्या अभ्यासातून दिसून आलं की, क्लिनिकली मान्यता मिळालेली ही क्रिम कीटकजन्य आजारांपासून संरक्षण देतं. ही क्रिम फक्त एका विशेष व्हायरसला लक्ष्य करत नाही, तर वेगवेगळ्या व्हायरसवर परिणामकारक आहे. जर आम्ही केलेलं हे संशोधन उपचार म्हणून विकसित झालं, तर वेगानं पसरणाऱ्या आणि परिणामकारक असे उपचार नसलेल्या कीटकजन्य आजारांशी लढा देता येऊ शकतो" संशोधनाचे अभ्यासक डॉ. केव्ह शॅम्स म्हणाले, "डास चावल्यानंतर हे क्रिम वापरणं योग्य आणि सुरक्षित आहे, याची ग्वाही देण्यासाठी अधिक चाचणीची गरज आहे, त्यामुळे आताच लोकांनी हे क्रिम डास चावल्यानंतर वापरू नये, असं आवाहन आम्ही करतो. मात्र मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या कीटकजन्य आजारांपासून संरक्षण देण्यात आमच्या अभ्यासाची नक्कीच मदत होईल, अशी आशा आम्हाला आहे. अँटी व्हायरल ट्रिटमेंट म्हणून जर आम्ही हे क्रिम वापरू शकलो, तर डासांपासून होणाऱ्या धोकादायक आजारांपासून संरक्षण देण्यासाठी हे क्रिम mosquito repellent म्हणून वापरता येईल" सोर्स - मेडिकल एक्स्प्रेस
    अन्य बातम्या लक्षणं दिसण्याआधीच समजणार टीबी बटाटा खाऊन वजन वाढणार नाही तर कमी होईल! फक्त खाण्याची पद्धत बदला
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या