मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'हा' रक्तगट असलेल्या लोकांना जास्त प्रमाणात चावतात डास, या लोकांना असतो जास्त धोका

'हा' रक्तगट असलेल्या लोकांना जास्त प्रमाणात चावतात डास, या लोकांना असतो जास्त धोका

कधी कधी आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये असतो आणि एखाद्याच्याच डोक्यावर डासांचा मळभ घोंगावत असतो. अशावेळी ती व्यक्ती डासांची शिकार होते. होय, डासदेखील आपली शिकार स्वतः निवडतात.

कधी कधी आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये असतो आणि एखाद्याच्याच डोक्यावर डासांचा मळभ घोंगावत असतो. अशावेळी ती व्यक्ती डासांची शिकार होते. होय, डासदेखील आपली शिकार स्वतः निवडतात.

कधी कधी आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये असतो आणि एखाद्याच्याच डोक्यावर डासांचा मळभ घोंगावत असतो. अशावेळी ती व्यक्ती डासांची शिकार होते. होय, डासदेखील आपली शिकार स्वतः निवडतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 जानेवारी : एखादेवेळी तुमच्या निदर्शनास आले असेल की, आपण जेव्हा लोकांच्या घोळक्यात असतो तेव्हा काही विशिष्ट लोकांनाच डास जास्त प्रमाणात चावतात. कधी कधी आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये असतो आणि एखाद्याच्याच डोक्यावर डासांचा मळभ घोंगावत असतो. अशावेळी ती व्यक्ती डासांची शिकार होते. होय, डासदेखील आपली शिकार स्वतः निवडतात. त्यासाठी त्यांचे काही ठराविक निकष असतात.

असे काही घटक आहेत जे यासाठी कारणीभूत आहेत. जर्नल ऑफ मेडिकल एंटोमोलॉजीच्या एका नियंत्रित अभ्यासात असे आढळले आहे की, 'O' हा रक्तगट असलेल्या लोकांमध्ये डास चावण्याची समस्या 'A' रक्तगट असलेल्या लोकांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट प्रमाणात आढळते. संशोधकांनी असेही सांगितले आहे की, आहे की याचा संबंध आपण निर्माण केलेल्या स्रावांशी आहे. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या रक्तावरून डास निघूनदेखील जातात.

मांसाहाराचे शौकीन असाल तर व्हा सावध, होऊ शकतात हे गंभीर दुष्परिणाम

कार्बन डाय ऑक्साइड

डासांना लांबून कार्बन डाय ऑक्साईड जाणवू शकतो. ते दुरूनही आपल्या शरीराचा सुगंध घेऊ शकतात. त्यामुळेच डासांना तुमचा मागोवा घेण्यास मदत होते. म्हणूनच जास्त कार्बन डायऑक्साइड सोडणाऱ्या लोकांकडे डास अधिक आकर्षित होतात.

चयापचय दर आणि बॅक्टरीया

ज्यांची चयापचय गती जास्त असते ते डास जास्त चावतात. उदाहरणार्थ गरोदर महिला. त्यांचा चयापचय दर जास्त असतो. त्यामुळे त्यांना डास चावण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर जिथे जिवाणू जास्त असतात तिथे म्हणजेच आपल्या पायाला डास जास्त चावतात. कारण पायांवर बॅक्टेरिया असण्याची शक्यता जास्त असते.

जास्त घाम

वास घेण्यासाठी डासांची नाक खूप तीक्ष्ण असते. उदाहरणार्थ, ते लॅक्टिक ऍसिड, अमोनिया आणि घामाने उत्सर्जित होणाऱ्या इतर संयुगांचा वास घेऊ शकतात. जास्त व्यायामामुळे शरीरात लॅक्टिक अॅसिड आणि उष्णता वाढते. याशिवाय काही अनुवांशिक कारणांमुळेही शरीराला दुर्गंधी येते. या दुर्गंधींचा वास डासांना लवकर येतो. याशिवाय घामाच्या वासामुळेही डासाजास्त चावतात.

तरुण भारतीयांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढतंय!

ड्रेसिंग स्टाईल

जर तुम्हाला जास्त डास चावत असतील तर तुमचा पेहरावदेखील यासाठी जबाबदार असू शकतो. संशोधनानुसार, गडद रंग डासांना खूप आवडतो. जे लोक हिरवा, काळा आणि लाल असे गडद रंगाचे कपडे घालतात, त्यांना डास जास्त चावतात. त्याऐवजी हलके रंग जसे की पेस्टल, बेज किंवा अगदी पांढरा रंग निवडा.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle