सकाळी उपाशीपोटी हे 5 पदार्थ नक्की खा, दिवसभर राहाल फ्रेश

सकाळी उपाशीपोटी हे 5 पदार्थ नक्की खा, दिवसभर राहाल फ्रेश

सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा खूप पाणी प्यायलं पाहिजे. सकाळी आपण जे खातो ते पौष्टिक असलं पाहिजे. मेंदूला बराच वेळ आराम दिल्यानंतर ऊर्जेची आवश्यकता असते. त्यासाठी हे खा.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : डॉक्टरांच्या मते, सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी चांगला असतो. पण नाश्त्यामध्ये नेमकं काय खावं हे ठरवणंही कठीण काम आहे. दिवसाचं पहिलं खाणं म्हणजेच ब्रेकफास्ट पौष्टिक हवा कारण तेव्हा आपलं पोट रिकामं असतं. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा खूप पाणी प्यायलं पाहिजे. सकाळी आपण जे खातो ते पौष्टिक असलं पाहिजे. मेंदूला बराच वेळ आराम दिल्यानंतर ऊर्जेची आवश्यकता असते. त्यासाठी हे खा.

भिजवलेले बदाम

बदाम आरोग्यासाठी खूप चांगले असतात. त्यामध्ये पोषक घटक असतात. मँगेनिज, व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर, ओमेगा - 3, फॅटी अॅसिड बदामांमध्ये भरपूर प्रमाणात असतात. रात्री 5 बदाम भिजवून ते सकाळी खावेत. बदामाच्या ऐवजी तुम्ही शेंगदाणेही खाऊ शकता.

पपई

पपई एक मस्त फळ आहे. हे खाल्लं की पोट साफ होतं. पपईमुळे शरीरातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं आणि हृदयरोगही होत नाही. उपाशीपोटीही तुम्ही पपई खाऊ शकता. पपईमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्याने डोळ्यांसाठीही ते चांगलं आहे.

कोमट पाणी आणि मध

सकाळी कोमट पाण्यात मध घालून पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं. यामध्ये मिनेरल्स, व्हिटॅमिन भरपूर असतात.

अंडी

तुम्ही उपाशीपोटी उकडलेली अंडी खाऊ शकता. यामुळे तुमचं वजनही कमी होईल. कारण अंडी खाल्ली तर बराच वेळ तुमचं पोट भरलेलं राहतं. अंड्यांमध्ये प्रोटीनही चांगलं मिळतं.

सब्जा

सब्जामुळे वेगवेगळे लाभ होतात. प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, ओमेगा - 3 हे सगळं सब्जामध्ये असतं. रात्री सब्जा भिजवून त्या बिया सकाळी नुसत्या खाल्ल्या तरी चालतं. यामुळे पण भरपूर मिनेरल्स, व्हिटॅमिन्स मिळतात.

=========================================================================================

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 07:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading