मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

डायबेटिजवर उपयुक्त 3 वनऔषधी; आयुर्वेदिक उपचारांनी नियंत्रणात ठेवा मधुमेह

डायबेटिजवर उपयुक्त 3 वनऔषधी; आयुर्वेदिक उपचारांनी नियंत्रणात ठेवा मधुमेह

आंब्यामध्ये 90 टक्के कॅलरी साखरेच्या स्वरूपात असते आणि त्यामुळेच डायबेटिसच्या रुग्णांची ब्लड शुगर वाढू शकते. मात्र यामध्ये असणारं फायबर आणि ऍन्टिऑक्सिडंट ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकतं.

आंब्यामध्ये 90 टक्के कॅलरी साखरेच्या स्वरूपात असते आणि त्यामुळेच डायबेटिसच्या रुग्णांची ब्लड शुगर वाढू शकते. मात्र यामध्ये असणारं फायबर आणि ऍन्टिऑक्सिडंट ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकतं.

काही अशा वनऔषधी आहेत ज्यांनी तुम्ही तुमचा मधुमेह (diabetes) नियंत्रणात ठेवू शकता.

  • myupchar
  • Last Updated :

अनियमित जीवनशैली आणि आहारामधील निष्काळजीपणामुळे हृदय विकार, मधुमेह (Diabetes) यासारखे आजार लहान वयातच दिसून येत आहेत. मधुमेहात शरीरात साखरेची पातळी अनियंत्रित होते. मधुमेह होण्याची अनेक कारणे असू शकतात. विशेषत: टाइप -2 मधुमेह होण्यासाठी ताणतणाव, लठ्ठपणा आणि जीवनशैलीतील अनियमितता, आनुवंशिकता कारणीभूत असते.

एकदा मधुमेह झाल्यावर तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. मात्र नियमित आहार आणि नियमित व्यायामाद्वारे तो संतुलित होऊ शकतो. इन्सुलिन इन्जेक्शन, औषधं घेऊन मधुमेह नियंत्रणात ठेवला जातो. तसंत मधुमेहावर आयुर्वेदिक उपचारही आहेत. काही अशा वनऔषधी आहेत ज्यांनी तुम्ही तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवू शकता.

गुळवेल

गुळवेल ज्याला वैज्ञानिक भाषेत टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया म्हणतात. गुळवेल वनस्पतीची पानं रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात आणि त्यामुळे मधुमेह नियंत्रित करता येतो. यामुळे रोग प्रतिकारशक्ती सुधारते. यातील अँटिऑक्सिडंट शरीरातून हानिकारक पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करतात. या औषधामुळे स्वादुपिंडाच्या बीटा पेशींचं उत्पादन वाढवण्यात देखील मदत होते. यासाठी या औषधी वनस्पतीची पावडर किंवा पानं एक ग्लास पाण्यात बुडवून ठेवा. सकाळी ते गाळून प्या.

सदाहरित फुलं

सदाहरित फुलांचा वापर मधुमेहावर उपचार करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे सदाबहार पेरीविंकल म्हणून ओळखलं जातं. टाइप -2 मधुमेहासाठी निसर्गोपचार म्हणून त्याची फुलं आणि पानं वापरली जातात. या वनस्पतीची काही पानं चघळा किंवा सदाहरित गुलाबी फुलं एक कप पाण्यात उकळवून ते पाणी गाळून दररोज रिकाम्या पोटी प्या. यामुळे शरीरातील साखर नियंत्रित होईल.

विजयसार

बर्‍याच आयुर्वेदिक संशोधनात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी विजयसार हे अत्यंत फायदेशीर औषध आहे. या औषधी वनस्पतीमधील अँटी-हायपरलिपिडिक गुणधर्म शरीरात कोलेस्ट्रॉल, कमी घनता असलेल्या लिपोप्रोटीन आणि सीरम ट्रायग्लिसेराइडची पातळी कमी करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त वारंवार लघवी होणं, लघवी करताना जळजळ अशा मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या समस्यादेखील दूर होता. पचन तंत्रामध्ये सुधारणा होते. विजयसार रात्री पाण्यात उकळवून ठेवा आणि हे पाणी सकाळी गाळून प्या.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - गिलॉयचे फायदे, वापर, सहप्रभाव आणि मात्रा

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

First published:

Tags: Ayurved, Health, Lifestyle, Tips for diabetes