मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

खरंच चंद्र भ्रमणावर चालतं मासिक पाळीचं चक्र? नव्या संशोधनातून झाला उलगडा

खरंच चंद्र भ्रमणावर चालतं मासिक पाळीचं चक्र? नव्या संशोधनातून झाला उलगडा

महिलांच्या मासिक पाळी (Menstrual Cycle) आणि चंद्र (Moon Cycle) यांचा काही संबंध आहे का? याचा गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास करण्यात येत आहे.

महिलांच्या मासिक पाळी (Menstrual Cycle) आणि चंद्र (Moon Cycle) यांचा काही संबंध आहे का? याचा गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास करण्यात येत आहे.

महिलांच्या मासिक पाळी (Menstrual Cycle) आणि चंद्र (Moon Cycle) यांचा काही संबंध आहे का? याचा गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास करण्यात येत आहे.

मुंबई, 23 सप्टेंबर : भारतीय संस्कृतीत चंद्र (Moon) आणि सूर्याच्या भ्रमणावर अनेक धार्मिक बाबी आधारलेल्या आहेत. अनेक धार्मिक कार्यं करण्यासाठी मुहूर्त ठरवताना चंद्र, सूर्याची स्थिती (Moon cycle) महत्त्वाची ठरते. राशीचक्रदेखील चंद्राच्या भ्रमणावर (Lunar cycle) आधारित आहे.  तसंच अमावास्या, पौर्णिमा या दिवसांवर समुद्राच्या भरती-ओहोटीचे आडाखे पूर्वापार बांधले जात आहेत. दरम्यान याच चंद्राचा संबंध महिलांच्या मासिक पाळीशी (Moon and menstrual period) असल्याचंही सांगितलं जातं. महिलांच्या मासिक पाळीचं चक्र चंद्र भ्रमणावर आधारित आहे (Moon cycle and menstrual cycle), असं मानलं जातं (Lunar cycle and menstrual cycle).

प्राचीन ग्रीक संस्कृतीनुसार (Greek Culture) मासिक पाळी हा शब्द चंद्रासाठीच्या Mene या लॅटिन (Latin) आणि ग्रीक शब्दावरून आला आहे. प्राचीन ग्रीसमध्ये मासिक पाळी आणि चंद्राचा संबंध आहे यावर ठाम विश्वास होता. त्यामुळे या काळात स्त्रिया आध्यात्मिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक शक्तिशाली असतात, असं मानलं जात असे. आयुर्वेद (Ayurveda) आणि हिंदू संस्कृतीनुसार (Hindu Culture), अनेक हिंदू आणि बौद्ध परंपरादेखील मासिक पाळी आणि चंद्र यांच्यातल्या संबंधाबद्दल भाष्य करतात. आयुर्वेदानुसार रक्ताला संस्कृतमध्ये ‘रक्त’ म्हणतात आणि असे मानले जाते की ते चंद्राद्वारे नियंत्रित होते. मासिक पाळी चंद्राच्या चक्राशी सुसंगत असेल, तर ते आरोग्यासाठी चांगलं असतं असं आयुर्वेदात म्हटलं आहे.

मासिक पाळी आणि चंद्राच्या संशोधनाबाबत संशोधन

स्त्रियांची मासिक पाळी (Menstrual Cycle) आणि चंद्राचं भ्रमणचक्र (Moon Cycle) या विषयाचाही गेल्या शेकडो वर्षांपासून अभ्यास करण्यात येत आहे.  मानवी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणाऱ्या चार्ल्स डार्विन (Charles Darwin) यांनी पहिल्यांदा मासिक पाळी आणि चंद्र यांच्यातला संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा - Menstrual Hygiene Day: अंधविश्वास नको, समजून घ्या 'त्या' दिवसांतील नियमांमागील खरं लॉजिक

यानंतर याबाबतीत बरंच संशोधन करण्यात आलं. ज्या स्त्रियांची मासिक पाळी अमावास्येच्या दरम्यान सुरू होते, त्या गर्भवती होण्याची अधिक शक्यता असते, असं 1977 मध्ये झालेल्या एका संशोधनात आढळलं होतं. 1986 मध्ये झालेल्या एका संशोधनात 826 महिलांच्या मासिक पाळी चक्राचा आणि चंद्राच्या भ्रमणचक्राचा अभ्यास करण्यात आला. त्यात 28.3 टक्के महिलांना अमावास्येदरम्यान मासिक पाळी सुरू झाल्याचं आढळून आलं. 1987 मध्ये झालेल्या एका अभ्यासातदेखील याला पुष्टी मिळाली. त्यामुळे या गृहीतकावरचा विश्वास वाढण्यास मदत मिळाली.

नव्या संशोधनात काय दिसून आलं?

अलीकडच्या काही संशोधनांत मात्र याला पुष्टी मिळाली नाही. 2013 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात एका कॅलेंडर वर्षासाठी (Calendar Year) 74 महिलांचं निरीक्षण करण्यात आलं. परंतु शास्त्रज्ञांना मासिक पाळी आणि चंद्राच्या चक्रामध्ये कोणताही संबंध आढळला नाही. 2019 मध्ये 1.5 दशलक्ष युझर्सचा डेटा वापरून करण्यात आलेल्या अभ्यासातही या गृहीतकाला दुजोरा देणारा कोणताही पुरावा मिळाला नाही.

2021 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, पूर्वीच्या काळी मासिक पाळी आणि चंद्राचं भ्रमणचक्र यांचा परस्पर संबंध होता. परंतु कृत्रिम प्रकाश आणि आधुनिक जीवनशैली यामुळे हा संबंध नष्ट झाला असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. या अभ्यासात 8 महिलांचा समावेश होता, ज्यांनी 19 ते 32 वर्षं वयापर्यंतच्या कालावधीत मासिक पाळी चक्राचा मागोवा घेतला. यापैकी 5 महिलांचा मासिक पाळी कालावधी चंद्राच्या चक्राशी सलगपणे नसला तरी अधूनमधून जुळला जात होता. 3 स्त्रियांमध्ये पौर्णिमा आणि अमावास्येच्या वेळी मासिक पाळी येण्याचा घनिष्ट संबंध दिसून आला. 2019 मध्ये ब्लड मूनच्या दिवशी आपल्याला मासिक पाळी आल्याचं अनेक महिलांनी सोशल मीडियावर सांगितलं.

हे वाचा - मासिक पाळीच्या वेळी रक्तस्त्रावाचा रंग बदलला? घाबरू नका, पण दुर्लक्षही करू नका

 रिपोर्टनुसार आजही शास्त्रीय संशोधनात या गृहीतकाबाबत ठाम पुरावे मिळाले नसल्यानं या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे या बाबतीत कोणत्याही ठाम निष्कर्षापर्यंत पोहोचता आलं नाही. याविषयी आणखी संशोधन होण्याची गरज आहे. अनेक वैज्ञानिक अभ्यासांनी या गृहीतकाचं खंडन केलं असलं तरी आजही असंख्य सामान्य नागरिकांचा यावर विश्वास आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle, Moon, Periods