मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /थंडीत Mood Swings चे बळी ठरता आहात?, मग आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

थंडीत Mood Swings चे बळी ठरता आहात?, मग आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

थंडीमध्ये मूड ठीक करण्यासाठी खाण्यापिण्यात बदल करणं हा एक चांगला उपाय आहे.

थंडीमध्ये मूड ठीक करण्यासाठी खाण्यापिण्यात बदल करणं हा एक चांगला उपाय आहे.

थंडीमध्ये मूड ठीक करण्यासाठी खाण्यापिण्यात बदल करणं हा एक चांगला उपाय आहे.

मुंबई, 02 डिसेंबर: सध्या हिवाळा ऋतू (Winter) सुरू झाला आहे. सुरुवातीला काही दिवस वातावरणामध्ये गारवादेखील जाणवू लागला होता होता; मात्र अचानक वातावरणात बदल झाल्यानं राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी पाऊस अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. वातावरणातील या सर्व बदलांचा आणि हवेतल्या वाढत्या गारव्याचा सर्वांत मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. थंडीमध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती देखील काहीशी कमकुवत झालेली असते. सध्याचं हवामान शारीरिक (Physical Health) आणि मानसिक (Mental Health) आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं नाही. अनेक जणांना डिप्रेसिंग (Depressing) वाटू शकतं. त्यामुळं आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे. थंडीमध्ये मूड ठीक करण्यासाठी खाण्यापिण्यात बदल करणं हा एक चांगला उपाय आहे. असे काही खाद्यपदार्थ (Food) आहेत, की ज्यांच्यामध्ये आपला मूड बदलण्याची (Mood swnings) क्षमता असते. हे पदार्थ खाल्ल्यानं नकारात्मक भावना (Negativity) नाहीशी होते आणि आपल्याला आनंदी वाटतं. 'एबीपी न्यूज'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

मूड बदलण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील, अशा काही खाद्यपदार्थांची माहिती पुढे दिली आहे.

तिळाचे लाडू : एनर्जी बूस्टर समजले जाणारे तिळाचे लाडू डिप्रेशन (Depression) आणि टेन्शनपासून मुक्त होण्यास मदत करतात. तिळाच्या अंगी उष्णता असते. त्यामुळे थंडीमध्ये गूळ आणि तुपापासून बनवलेले तिळाचे लाडू खाणं खूप फायदेशीर ठरतं. याच मिश्रणापासून तुम्ही चिक्कीदेखील तयार करू शकता.

हेही वाचा-  Banana Peel Benefits : केळीच्या सालींमध्येही असतात इतके पोषक घटक, वाचून केळासोबत सालही खाल

 ब्लॅक कॉफी : ब्लॅक कॉफीमध्ये (Black coffee) मोठ्या प्रमाणात कॅफिन (Caffeine) असतं, ही गोष्ट तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. कॉफीमध्ये असलेलं कॅफिन मेंदूतली हॅपी हॉर्मोन्स (Happy hormones) जास्त प्रमाणात स्रवण्यास मदत करतं आणि मेंदूला आराम देतं. कॅफिन आणि इतर घटकांमुळे आपल्या मनःस्थितीवर चांगला परिणाम होतो. त्यामुळे थंडीमध्ये मनाला आलेली मरगळ आणि शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी ब्लॅक कॉफी पिण्याचा सल्ला दिला जातो.

चिक्की किंवा गुळाची पट्टी : शेंगदाणे आणि गुळापासून बनवलेल्या चिक्कीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोफेनॉल (Phytophenol) आढळतात. हे दोन्ही घटक तणाव, नैराश्यासारख्या मेंदूच्या समस्यांवर मात करण्यास मदत करतात. चिक्कीमध्ये असलेली मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स (Monounsaturated fatty acids) हृदयाची काळजी घेतात आणि कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित ठेवतात. याशिवाय ती मेंदूतली हॉर्मोन्स संतुलित ठेवण्याचं कामही करतात.

हेही वाचा-  Killer Tree : फक्त स्पर्श केला तरी होतो मृत्यू; चुकूनही या सुंदर झाडाच्या जवळ जाऊ नका

 वरील तिन्ही खाद्यपदार्थ अतिशय सोपे आणि सहज बनवता येण्याजोगे आहेत. त्यामुळे थंडीमध्ये तुमचा मूड ठीक नसेल तर हे खाद्यपदार्थ एकदा नक्की खाऊन बघा.

First published:

Tags: Lifestyle