Home /News /lifestyle /

Monsoon Tips : पावसाळ्यात घराच्या भिंतींचे नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Monsoon Tips : पावसाळ्यात घराच्या भिंतींचे नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स

जास्त आर्द्रता असलेल्या पावसाळ्यात आपल्या घराची विशेष काळजी (Home Care In Monsoon) घेणे आवश्यक आहे. पावसाने भिंती फुगायला लागतात आणि एक विचित्र वास घरात येऊ लागतो.

  मुंबई, 01 जुलै : पावसाळ्यात (Rainy Season) सर्वात मोठी समस्या (Monsoon Problems) असते ती म्हणजे घरामध्ये पाणी येण्याची, घराच्या भिंती ओल्या होण्याची. जास्त आर्द्रता असलेल्या पावसाळ्यात आपल्या घराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाने भिंती फुगायला लागतात आणि एक विचित्र वास घरात येऊ लागतो. हे होण्यापासून रोखण्यासाठी (Monsoon Tips) तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. घराचे व्हेंटिलेशन (Ventilation Of Home) पावसाळ्यात घरात पुरेशी हवा खेळती नसल्यास, घरात ओलावा निर्माण होऊ शकतो ज्यामुळे भिंतींचे नुकसान होते. असे होऊ नये याची खात्री करण्यासाठी, पाऊस नसताना पंखा वापरून किंवा खिडक्या उघडून घर हवेशीर ठेवण्याचा प्रयत्न करा. विशेषतः स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये याची जास्त गरज असते.

  Alia Bhatt Pregnancy : आलियाने बदललेल्या Instagram DP ची चर्चा; हाच तो क्षण ज्या वेळी रणबीरने केलं होतं प्रपोज

  वॉटर प्रूफिंग करणे (House Water Proofing) पावसाळ्यात मुख्य समस्या म्हणजे घराच्या छतातून किंवा भिंतींच्या भेगांमधून पाणी टपकने. त्यामुळे भिंतींना ओलावा येतो. म्हणूनच पावसाळ्यापूर्वीच घराचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी छताला गळती होण्यापासून वाचवा. घराची नीट तपासणी करा आणि गळती होण्याची शक्यता असलेल्या भिंती किंवा छत दुरुस्त करून घ्या. वॉटर प्रूफिंग करा. त्यामुळे पाणी घरात येणार नाही. घरात हवा पुरेसा सूर्यप्रकाश (Sufficient Sunlight) पावसाळा हा असा ऋतू आहे ज्यावेळी सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे जेव्हा बाहेर सूर्यप्रकाश असतो तेव्हा घराचे सर्व पडदे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्या. घरात पुरेसा सूर्यप्रकाश असला तर घरात बुरशी तयार होत नाही. आर्द्र वातावरणात बुरशी जास्त तयार होते. हे भिंतींचे संरक्षण करण्यास तसेच दुर्गंधी दूर ठेवण्यास मदत करेल. Alia Bhatt pregnancy: आलियाच्या गुड न्यूजनंतर कंडोम कंपनीची अफलातून पोस्ट VIRAL! इलेक्ट्रिकल वायरिंग तपासा (Checking Electric wires) पावसात घरातील इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये दोष किंवा समस्येमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी घराच्या बाहेर जे काही विजेच्या तारा दिसतील त्या एका बॉक्समध्ये ठेवा. शॉर्ट सर्किटचा धोका टाळण्यासाठी वायरिंग आणि वीज जोडणी व्यवस्थित तपासा. व्होल्टेजच्या चढउतारांवर लक्ष ठेवा. भारतीय घरांमध्ये फरशी स्वच्छ ठेवण्यासाठी ती जास्तवेळा पुसली जाते. मात्र पावसाळ्यात यामुळे घरामध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यापेक्षा फक्त वेळोवेळी झाडून घेणे योग्य राहील. त्याचबरोबर तुम्ही वेळोवेळी प्लंबरकडून घराची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून जर घरात कुठे पाणी गळती होत असेल तर त्यावर त्वरित उपाय निघेल.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Lifestyle, Monsoon

  पुढील बातम्या