मान्सून रोमँटिक डेटवर जाण्याचा प्लान करताय, मग असं जपा तुमचं आरोग्य!

पावसाळ्यातलं रोमॅन्टिक वातावरण सगळ्यांनाच प्रेमाची गोड चाहूल देऊन जातं. पण पावसाळ्यात डेटवर जाताना या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 06:31 AM IST

मान्सून रोमँटिक डेटवर जाण्याचा प्लान करताय, मग असं जपा तुमचं आरोग्य!

मुंबई, 21 जुलै : सिनेमातल्या गाण्यांपासून ते कविता आणि गझलांपर्यंत सगळीकडेच पावसाचं कौतुक होतं. पावसाळ्यातलं रोमँटिक वातावरण सगळ्यांनाच प्रेमाची गोड चाहुल देऊन जातं. पण हा पाऊस मुसळधार आहे त्यामुळे तो तुमची साथ कधी सोडेल याचा नेम नाही. या रोमँटिक वातावरणात तुम्ही कधी आजारी पडाल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे थोडी काळजी घ्यायला हवी.

पावसातल्या पाण्यात अनेक जंतू असतात. त्यापासून आपला बचाव करण्यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे जर तुम्ही पार्टनरसोबत डेटवर जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर पावसातल्या या आजारांपासून सावध राहा. पावसाळ्यात डेटवर जाताना या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

पावसात भिजल्यानंतर आंघोळ करा

पावसाचे थेंब अंगावर झेलायला आपल्या खूप आवडतं पण भिजल्यानंतर अंघोळ करायला विसरू नका, त्याने 80% रोगराई नष्ट होते.

केसांची काळजी घ्या

Loading...

पावसाच्या पाण्याने आणि त्यात असणाऱ्या काही विषाणूंमुळे आपले केस खराब होतात आणि केस गळतीही होते. तर मग या वातावरणात केसांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी केसांना शॅम्पू आणि कंडिशनर लावा

त्वचा आणि नखांची काळजी घ्या

मान्सूनच्या काळात चेहऱ्याला स्क्रबिंग केल्याने चेहरा साफ तर होईलचं पण त्याबरोबर तुम्ही सुंदरही दिसाल, त्यामुळे डेटवर जाण्याआधी स्क्रबिंग करायला विसरू नका. त्यात जर तुमची त्वचा तेलकट असेल तर चेहरा वारंवार टिश्यू पेपरने साफ करत रहा.

सॅनिटायझर नेहमी सोबत ठेवा

पावसाळ्यात सहज रोगराईशी संपर्क होतो. ज्याने सर्दी, खोकला, ताप असे संसर्गजन्य आजार होतात. या आजाराने आपला पार्टनरही आजारी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या पार्टनरसोबत बाहेर जाताना सॅनिटायझरचा वापर करा.

पेडिक्युअर जरूर करा

पायांची योग्य निगा राखली म्हणजे पेडिक्युअर केलं तर त्याने पायांना होणाऱ्या संसर्गपासून तुम्ही तुमचे रक्षण करू शकता. पावसाळ्यात पायांना दुर्गंध येतो त्याला टाळण्यासाठी टालकम पावडरचा वापर करा.

स्वच्छ कपडे आणि फ्रेश लुक

घाणेरडे आणि ओले कपडे घालू नका त्याने लवकर आजारी पडण्याची शक्यता आहे.स्वच्छ कपडे घाला आणि परफ्यूमचाही वापर करा.

=============================================================

SPECIAL REPORT: विहीर नाही तर पाणी चोरीला गेलं; ग्रामस्थांवर राखण करण्याची वेळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 06:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...