बीजिगं, 02 जुलै : एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे (organ donation) कित्येक गरजूंचा जीव वाचू शकतो. मात्र अवयवांची गरज असलेल्यांची संख्या जास्त आणि अवयवदात्यांची संख्या कमी अशी परिस्थिती सध्या आहे. अशात आता डुकरामार्फत (pig) माकडाला (monkey) देण्यात आलेल्या अवयवामुळे माकड जगल्याने एक आशेचा किरण दिसू लागला आहे. भविष्यात प्राण्यांमार्फत माणसांवर अवयव प्रत्यारोपण (organ transplant) करणं शक्य होईल, अशी आशा आता शास्त्रज्ञांना आहे.
चीनच्या झिआनमधील एका हॉस्पिटलमध्ये तीन माकडांवर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. झिजिंग हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जीन एडिटेट डुकराच्या शरीरातील यकृत, हृदय आणि किडनी असे तीन अवयव काढले. हे तीनही अवयव प्रत्येकी एक अशा तीन माकडांमध्ये प्रत्यारोपित केले. किडनी आणि हृदय प्रत्यारोपित करण्यात आलेली अशी दोन्ही माकडं जगली नाहीत. मात्र ज्या माकडावर यकृत प्रत्यारोपित करण्यात आलं ते माकड 18 दिवस जिवंत राहिलं. झिनुआ न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.
हे वाचा - डायलेसिस करताना रुग्णाचा मृत्यू, डॉक्टर घरीबसून VCवर देत होता कंपाउडरला सूचना
माकडांमध्ये डुकराचे अवयव पहिल्यांदाच प्रत्यारोपित करण्यात आलेले नाहीत. याआधी चीनमध्येच एका माकडाच्या शरीरात डुकराचं यकृत प्रत्यारोपित करण्यात आलं हे माकड 14 दिवस जगलं. तर त्यानंतर अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात माकड 15 दिवस जगलं. तर आता चीनमध्ये पुन्हा करण्यात आलेल्या या प्रयोगात हे माकड 18 दिवस जगलं आहे, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, डुकराच्या शरीरातील अवयवामुळे माकड जगणं म्हणजे माणसांवरही असं अवयव प्रत्यारोपण करणं शक्य असण्याचे हे संकेत आहेत. माकडामध्ये 94% मानवी डीएनए असतात, त्यामुळे माणसांवरही हा प्रयोग यशस्वी होईल अशी आशा आता आहे. आता आनुवंशिकरित्या नियंत्रित प्राण्यामध्ये मानवी अवयव वाढवून ते मानवी शरीरात प्रत्यारोपित करता येतील, अशी आशा तज्ज्ञांना आहे.
हे वाचा - Corona च्या लशीची कदाचित गरजच लागणार नाही - Oxford च्या तज्ज्ञांचा दावा
प्राण्यांमार्फत मानवी शरीरात अवयव प्रत्यारोपण करणं याला Xenotransplantation असं म्हणतात. यासाठी डुकर हा प्राणी योग्य मानलं जातो आहे कारण त्याच्या अवयवाचा आकार हा मानवी अवयवांच्या आकाराप्रमाणेच असतो.
संकलन, संपादन - प्रिया लाड