मुंबई, 06 जानेवारी : एक सिंह (lion) जरी समोर आला तरी कित्येकांना घाम फुटतो. प्राण्यांची तर घाबरगुंडी उडते. सिंहापासून जीव वाचवण्यासाठी प्राणी (animal) आहेत तिथून धूम ठोकण्याचा प्रयत्न करतात. पण त्याला सामोरं जाऊन त्याच्याशी टक्कर देणारे प्राणी दुर्मिळच. अशाच एका प्राण्याचा व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होतो आहे.
एका छोट्याशा मुंगुसाला (mongoose) एक-दोन नव्हे तर चक्क तीन सिंहांनी घेरलं. पण त्यांना न घाबरता एवढ्याशा मुंगुसानं एकट्यानं त्यांच्याशी लढाई केली आहे. आयएफएस अधिकारी सुसांत नंदा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटवर पोस्ट केला आहे.
Believe in yourself. You are braver than you think....
That’s precisely how this mongoose dented the pride of a pride of lions. 🎥:In the clip pic.twitter.com/p7q9kVjbzR — Susanta Nanda IFS (@susantananda3) January 3, 2021
व्हिडीओत पाहू शकता तीन सिंह एका मुंगुसाच्या शिकारीसाठी आली आहेत. ते मुंगुसावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. पण मुंगुस काही त्यांना आपल्याला हातही लावू देत नाही. जेव्हा जेव्हा सिंह त्या मुगुंसावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतं तेव्हा तेव्हा मुंगुसही त्याला प्रतिकार करतो आणि सिंहाला मागे पाऊल घ्यायला भाग पाडतो. इतकंच नव्हे तर तिन्ही सिंह त्याला घेरतात. पण तरी मुंगुस काही घाबरत नाही. तो तिघांनाही चांगलाच चकवा देतो. तीन-तीन सिंह असूनही एवढ्याशा एकट्या मुंगुसाचं ते काहीच बिघडवू शकत नाहीत.
हे वाचा - घोडेस्वारी गेली उडत; गारठलेल्या घोड्यानं पांघरूण ओढून मारला Chill; पाहा VIDEO
खरंतर तुम्ही उंदीर-मांजराला पाहिलं आहे ना? हा व्हिडीओ पाहताना डोळ्यासमोर काही क्षण तेच दोघं येतील. उंदीर जसा मांजराला चकवा देतो अगदी तसंच या मुगुंसानं केलं. त्यानं सिंहांची अवस्थाही एखाद्या मांजराप्रमाणेच केली. शरीरानं भले शरीरानं मोठे आहेत, मुंगुस त्यांच्यापेक्षा आकारानं लहान. पण तरी त्यांच्यातील लढाई बरोबरीची आहे.
सुसांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना ट्वीट केलं की, "स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही विचार करता त्यापेक्षा कितीतरी शूर असता. अगदी तसंच जसं ज्या मुंगुसानं गर्विष्ठ सिंहाच्या गर्विष्ठपणावरच हल्ला केला" यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वांनी मुंगुसाच्या हिमतीला दाद दिली आहे.
हे वाचा - शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ! हरणापुढे 'जंगल का राजा'ही ठरला फेल! शिकारीचा VIDEO VIRAL
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना. फक्त गोष्टीतच नाही तर प्रत्यक्षातही काही प्राणी याचा अवलंब करताना दिसतात. याआधीदेखील एका हरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यानं शक्तीनं नव्हे तर युक्तीनं सिंहापासून स्वतःला वाचवलं. शिकारीसाठी धावून आलेल्या सिंहाला त्यानं अत्यंत शिताफीनं फसवलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Viral, Viral videos