Home /News /lifestyle /

शरीरावरील एका छोट्याशा तिळाने वाचवला मॉडेलचा जीव; भयंकर आजाराचं वेळीच झालं निदान

शरीरावरील एका छोट्याशा तिळाने वाचवला मॉडेलचा जीव; भयंकर आजाराचं वेळीच झालं निदान

शरीर तिळांनी भरलेल्या या मॉडेलला ट्रोल केलं जात होतं. त्यापैकीच एका तिळामुळे मॉडेलचा जीव वाचला आहे.

    वॉशिंग्टन, 17 मे : आपल्या शरीरावर एखादा तीळ असावा असं बहुतेक तरुणींना वाटतं. गाल, हनुवटी, ओठांच्यावर तीळ असणं म्हणजे सौंदर्याचा एक भाग मानला जातो. काही तरुणी तर अशा भागावर तीळ नसेल तर कृत्रिम तीळ बनवूनही घेतात. सौंदर्यात भर टाकणारा हाच छोटासा तीळ कुणाचा जीवही वाचवू शकतो, यावर तुमचा विश्वास बसेल का? एका महिलेच्या बाबतीत हे घडलं आहे (Mole save model life from cancer). अमेरिकेच्या फ्लोरिडात राहणारी मॉडल एलिसन के बाऊल्स  (Alison Kay Bowles). ही एक प्रसिद्ध मॉडेल आहे, फोर्ब्स मॅगझिनवरही तिचा फोटो छापण्यात आला होता. तिच्या शरीरावर तीळच तीळ आहे. शरीर तिळांनी भरलेलं असल्याने तिला ट्रोलही केलं जात होतं. पण याच तिळांपैकी एका तिळाने तिचा जीव वाचवला आहे, असा दावा तिने केला आहे. हे वाचा - धक्कादायक! 'लपाछपी'चा खेळ चिमुकलीच्या जीवावर; मेंदूतून भळाभळा वाहू लागलं रक्त अखेर... एलिसनच्या शरीरावरील तिळांपैकी एका तिळाचा रंग बदलला. रिपोर्टनुसार तिच्या मैत्रिणीच्याबाबतीतही असं घडलं होतं. तेव्हा तिला एका गंभीर आजाराचं निदान झालं होतं आणि तिने एलिसनलाही याबाबत सावध केलं होतं. तिळाचा रंग किंवा आकार बदलला तर त्याकडे दुर्लक्ष करू नको, त्याला गांभीर्याने घे, असा सल्ला दिला होता.  त्यानंतर एलिसनच्या शरीरावरील एका तिळाचा रंग बदलला. तिन लगेच त्वचा तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेतली. वैद्यकीय तपासणीत तिला गंभीर आजार असल्याचं निदान झालं. तिने बायोप्सी केली तर तिला मेलानोमा कॅन्सर असल्याचं निदान झालं. तिच्या मैत्रिणीलाही हाच कॅन्सर झाला होता. एलिसनच्या आजाराचं निदान लवकर झाल्याने तिचा जीव वाचला. सर्जरी करून तिच्या शरीरावरील तीळ हटवण्यात आला. त्यामुळे ती महाभयंकर कॅन्सरपासून बचावली. सामान्य तीळ आणि मेलेनोमा कसा ओळखावा? कर्करोग नसलेले तीळ सामान्यतः एकसमान आणि आकारात सममितीय असतात. तर, मेलेनोमा बहुतेक वेळा आकारात असममित असतात. मेलेनोमामध्ये, तीळ किंवा चामखीळ यांच्या सीमा अनेकदा वेड्यावाकड्या असतात किंवा आकारात अनियमित असतात. तर कर्करोग नसलेल्या तीळांना सहसा गुळगुळीत, चांगल्या प्रकारे कडा असतात. हे वाचा - शरीरावर दिसत आहेत काही निराळ्याच खुणा? लवकर तपासून घ्या, कर्करोगाचा असू शकतो धोका जेव्हा शरीरावर जखम किंवा जखमा असतात तेव्हा त्वचेवर अनेकदा एकापेक्षा जास्त रंग दिसतात. ते असमान असू शकतात. काळ्या, तपकिरी, लाल आणि गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या छटांमध्ये त्वचेचा कर्करोग किंवा तीळ दिसू शकतात. तसंच, तुमच्या शरीरावरील इतर तीळांपेक्षा गडद रंगाचे तीळ शोधा. जे तीळ सौम्य असतात, ते सहसा एकाच रंगाचे असतात. सामान्य तीळ मेलेनोमाममध्ये कसा बदलतो? नेचर सेल बायोलॉजीमध्ये (Nature Cell Biology) प्रकाशित केलेल्या अभ्यासात, अमेरिकेतील दि युनिव्हर्सिटी ऑफ उटाह (The University of Utah) विद्यापीठातील संशोधक रॉबर्ट जुडसन टोरेस यांनी सामान्य तीळ मेलेनोमामध्ये कसा बदलू शकतो, याची माहिती दिली आहे. सूर्यकिरणांच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी मेलानोसाइट्स पेशी त्वचेला रंग देतात. मेलानोसाइट्सच्या डीएनए क्रमातील विशिष्ट बदलाला BRAF जनुक उत्परिवर्तन (BRAF gene mutation) म्हणतात. ते 75 टक्के तीळांमध्ये (Do not take lightly the mole of the Skin) आढळते. हे वाचा - शरीराच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; त्यांची जीवनात होते भरभराट मेलेनोसाइट्सचं मेलेनोमामध्ये रूपांतर होण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त उत्परिवर्तनाची आवश्यकता नसते. त्वचेत असलेल्या मेलॅनिन नावाच्या त्वचेला रंग देणाऱ्या रंगद्रव्याशी प्रखर सूर्यकिरणांचा अचानक संबंध आल्यास किंवा सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांशी (ultraviolet Rays) संपर्क आल्यास किंवा अचानक तीव्र स्वरूपाच्या वातावरणीय बदलांचा सामना करावा लागत असल्यास त्वचेवर परिणाम होतो. यातून मिळणाऱ्या वेगळ्या सिग्नल्समुळं मेलेनोसाइट्सचे जीन्स वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. त्यांचा वातावरणातील बदलांना मिळणारा प्रतिसाद बदलतो. याचा अर्थ, मेलेनोमा पर्यावरणीय संकेतांमुळं (environmental signals) सुरू होतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Cancer, Disease symptoms, Health, Lifestyle, Serious diseases

    पुढील बातम्या