मोदी सरकारची भेट! अर्ध्या किंमतीत मिळणार नव्या दमाची शेगडी

पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे गॅस सिलेंडरही महागला

  • Share this:

पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे गॅस सिलेंडरही महागला. दरम्यान मोदी सरकार गरीबांना कमीत कमी किंमतीत स्वयंपाक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देत आहेत.

सरकार उज्ज्वला योजनेअंतर्गत कमीत कमी किंमतीत विजेवर चालणारी शेगडी (इंडक्शन) देण्याची योजना आखत आहेत. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांची मोठी बचत होणार आहे.

या शेगडीमुळे प्रत्येक कुटुंबाचे वर्षात सुमारे १५०० रुपये वाचतील. ही शेगडी शहरी तसेच ग्रामीण दोन्ही ठिकाणी सहज वापरता येऊ शकते. एकहाती रक्कम देऊन ही शेगडी विकत घेता येऊ शकते. तसेच दर महिन्याला ठराविक हफ्ते देऊनही ही शेगडी वापरता येऊ शकते.

हफ्त्यांवर शेगडी विकत घेणाऱ्यांना महिन्याच्या लाईटच्या बिलासोबत शेगडीचा हफ्ताही भरावा लागणार. एनर्जी एफिशिएन्सी सर्विसेस लिमिटेड (EESL) या कंपनीने विजेवर चालणाऱ्या शेगडीचा पर्याय केंद्र सरकारला पाठवला आहे.

एका इंडक्शन शेगडीची किंमत किमान ८०० रुपये आहे तर दोन इंडक्शन शेगडींची किंमत १५०० रुपये आहे. सर्वसाधारण घरांमध्ये इंडक्शन शेगडीवर स्वयंपाक करायला साधारणपणे१०० युनिट वीज लागते. घरगुती गॅस सिलेंडर २२ ते २५ दिवस लागतो. यावेळी एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत राजधानी दिल्लीत ८७९ रुपये आहे.

Loading...

वीजेची समस्याही लवकरच दूर होईल. सरकारने यावर्षी डिसेंबर महिन्यात सौभाग्य योजनेअंतर्गत प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचं काम पूर्ण होणार आहे. २०२२ पर्यंत प्रत्येक घरात २४ तास वीज पोहोचवण्याचे प्लॅन तयार आहे. त्यामुळे वीजेच्या शेगडीला लागणाऱ्या वीजेची समस्या भविष्यात उरणार नाही.

वीजेची समस्याही लवकरच दूर होईल.
सरकारने यावर्षी डिसेंबर महिन्यात सौभाग्य योजनेअंतर्गत प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचं काम पूर्ण होणार आहे. २०२२ पर्यंत प्रत्येक घरात २४ तास वीज पोहोचवण्याचे प्लॅन तयार आहे. त्यामुळे वीजेच्या शेगडीला लागणाऱ्या वीजेची समस्या भविष्यात उरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2018 11:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...