मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

खर्चाची चिंता न करता बिनधास्त फिरा देश, केंद्र सरकार देणार पैसे

खर्चाची चिंता न करता बिनधास्त फिरा देश, केंद्र सरकार देणार पैसे

पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने भारतीय प्रवाशांसाठी एक योजना सुरू केली आहे.

पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने भारतीय प्रवाशांसाठी एक योजना सुरू केली आहे.

पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने भारतीय प्रवाशांसाठी एक योजना सुरू केली आहे.

  • Published by:  Suraj Yadav

नवी दिल्ली, 31 जानेवारी : पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने भारतीय प्रवाशांसाठी एक योजना सुरू केली आहे. या योजेनंतर्गत 2022 पर्यंत आपण ज्या राज्यात राहतो ते सोडून इतर 15 पर्यटनस्थळांना भेटी द्याव्या लागतील. या योजनेचा खर्च सरकार करणार आहे. पर्यटन मंत्रालयाने देखो अपना देश अशी योजना सुरू केली आहे. योजनेची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. देखो अपना देश योजनेंतर्गत कमीत कमी 15 पर्यटन स्थळे फिरावी लागतील.

केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी देखो अपना देश याबद्दलची माहिती ओडीसात झालेल्या राष्ट्रीय पर्यटन संमेलनात दिली. पटेल म्हणाले की, पर्यटन मंत्रालयाने एका वर्षात देशातील 15 पर्यटन स्थळे फिरणाऱ्या पर्यटकांचा खर्च आणि फोटो संकेतस्थळावर अपलोड करावे लागतील.

एका वर्षात 15 ठिकाणांना भेटी देण्याची ही योजना 2022 पर्यंत लागू आहे. तुम्ही तुमचे पर्यटन कधीही सुरू करू शकता. एका वर्षात हा प्रवास संपवावा लागेल. त्यानंतर संकेत स्थळावर https://pledge.mygov.in/my-country/ तुमचे फोटो अपलोड करावे लागतील.

वाचा : महाभयंकर कॅन्सरला दूर ठेवायचं आहे... मग फक्त 20 मिनिटं चाला

याशिवाय पर्यटकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी एक सर्टिफिकेट प्रोग्रॅम आयोजित करत आहे. यामध्ये ओडिसातील प्रोत्साहन देण्याची गरज आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे.

पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जात आहात, ‘या’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा

First published: