Moderna कंपनीनं दिली GOOD NEWS! गंभीर कोरोनावर 100% प्रभावी ठरली लस

जगाला सध्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवं आहे. आणि तो प्रश्न म्हणजे कोरोनावर लस केव्हा येणार? जगातले अनेक देश यावर संशोधन करत असून अनेक लशींच्या चाचण्या या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

मॉडर्नाच्या (Moderna) कोरोना लशीला (Corona vaccine) लवकरच आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याचीही शक्यता आहे.

  • Share this:
    वॉशिंग्टन, 30 नोव्हेंबर : अमेरिकेतील मॉडर्ना (Moderna Inc.) कंपनीनं आपल्या कोरोना लशीच्या (Corona vaccine) क्लिनिकिल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील अहवाल जारी केला आहे. ट्रायलमध्ये आपली लस 94.1% परिणामकारक असल्याचं मॉडर्नानं सांगितलं आहे. तर गंभीर कोरोनावर ही लस 100 टक्के प्रभावी ठरली आहे, असा दावाही केला आहे. मॉडर्नानं तिसऱ्या टप्प्यात 30,000 लोकांवर आपल्या लशीची चाचणी केली. त्यामध्ये  196 कोव्हिड 19 रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी 30 रुग्ण गंभीर होते. आणि या रुग्णांवर ही लस 100 टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं. लस 94.1% परिणामकारक असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. याआधी मॉडर्नानं 16 नोव्हेंबरला या चाचणीचा अंतरिम अहवाल सादर केला होता. त्यामध्ये आपली लस 94.5 टक्के परिणामकारक असल्याचं म्हटलं होतं. आता जारी केलेल्या रिपोर्टमध्ये हा परिणाम थोडा कमी म्हणजे 94.1% आहे. पण फारसा फरक नाही आहे. लशीचा परिणाम समोर आल्यानंतर या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळावी यासाठी मॉडर्नानं हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे (US Food and Drug Administration) परवानगी मागितली जाणार आहे. अमेरिकेच्या एफडीएनं (US FDA) कोणत्याही लशीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यासाठी ती लस 50 टक्के परिणामकारक असावी असं सांगितलं आहे. मॉडर्नाच्या लशीचा परिणाम 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कदाचित या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. हे वाचा - तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार CORONA VACCINE? एका क्लिकवर पाहा मोदी सरकारचा प्लॅन ही लस लवकरच उपलब्ध होईल. भारतही मॉडर्नाच्या संपर्कात आहे. या लशीसाठी सरकारला प्रति डोस 25 डॉलर (1854 रुपये) ते 37 डॉलर (2744 रुपये) दरम्यान किंमत मोजावी लागणा आहे. यासंदर्भात मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल यांनी एका जर्मन वृत्तपत्राला सांगितले की या लसीची किंमत देखील त्याच्या ऑर्डरच्या प्रमाणात अवलंबून असेल. स्टीफन यांनी सांगितलं की, मॉडर्नाने तयार केलेल्या लशीची किंमत साधारण फ्लूच्या लशीएवढी आहे. हे वाचा - Covidshield वर आरोप, 40 वर्षीय वॉलेंटियरवर सीरमकडून 100 कोटींचा मानहानीचा दावा आता Covid Vaccine च्या खरेदीसाठी देशा-देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. भारतात यापैकी किती लशी पोहोचणार आणि कधी हा खरा प्रश्न आहे. लशीसंदर्भात चांगली बातमी अशी की भारताने अगोदरच 150 कोटींहून अधिक लशींचे डोस मिळावेत म्हणून अॅडव्हान्स बुकिंग करत नंबर लावलेला आहे.
    Published by:Priya Lad
    First published: