Home /News /lifestyle /

तुमचा मोबाईल सांगणार तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; फक्त आवाजावरून होणार निदान

तुमचा मोबाईल सांगणार तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; फक्त आवाजावरून होणार निदान

मोबाईलमार्फतच (mobile) स्वतःची कोरोना टेस्ट (Corona test) करता येणार आहे.

    वॉशिंग्टन, 30 ऑगस्ट : सध्या कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आहे की निगेटिव्ह (corona negative) हे ओळखण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR) केली जातं. मात्र सर्वसामान्यपणे लक्षणं असलेल्या रुग्णांचीच टेस्ट होते. शिवाय त्याचा रिपोर्ट यायला वेळ लागतो आणि ही टेस्ट खर्चिकही आहे. त्यामुळे कोरोनाच्या निदानासाठी कमीत कमी वेळेत, स्वस्त आणि सहजसोप्या अशा टेस्ट विकसित करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आता लवकरच तुमच्या मोबाइलवर (mobile) अशी टेस्ट उपलब्ध होणार आहे. तुमच्या मोबाइलमार्फतच तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात की नाही हे समजणार आहे. त्यासाठी लवकरच तुमच्या मोबाइलमध्ये असं अॅप येणार आहे.  मोबाईलसमोर फक्त खोकून त्या खोकल्याच्या आवाजावरूनच तुमचा मोबाइल तुम्हाला तुमच्या कोरोना टेस्टचा रिझल्ट देणार आहे. अमेरिकेतील मॅस्सेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी (Massachusetts Institute of Technology - MIT) कोरोना टेस्टसाठी एक असं आर्टिफिशिअल इंटेलेजन्स (artificial intelligence) मॉडेल तयार केलं आहे. या एआय (AI) मॉडेलच्या माध्यमातून फक्त खोकल्याच्या आवाजातून एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही हे समजू शकतं. आयईईई जर्नल ऑफ इंजिनीअरिंग इन मेडिसीन अँड बायोलॉजी (IEEE Journal of Engineering in Medicine and Biology) मध्ये या मॉडेलबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे वाचा - Corona test : आता एका मिनिटात श्वासातून कळणार तुम्ही Covid पॉझिटिव्ह आहात का? तज्ज्ञांच्या मते कोव्हिड 19 चा खोकला आणि सामान्य खोकला याच्या आवाजात यामध्ये फरक आहे. हा आवाज फक्त ऐकण्यावरून समजणार नाही. मात्र (AI) मॉडेल ओळखू शकतं. त्यामुळे लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या आवाजावरून त्यांच्या कोरोनाचं निदान होऊ शकतं. लोकांनी वेब ब्राऊझर, सेलफोन आणि लॅपटॉपच्या माध्यमातून रेकॉर्ड केलेला आपला आवाज संशोधकांना पाठवला. खोकला आणि आवाजाचे जवळपास दहा हजार नमुन्यांचा वापर करून हे एआय मॉडेल विकसित केलं. त्यानंतर या मॉडेलची चाचणी घेण्यात आली तेव्हा कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 98.5 टक्के लोकांचं आणि कोरोनाची लक्षणं नसलेल्या 100 टक्के लोकांचं निदान या एआय मॉडेलनं केलं. हे वाचा - 5 महिने कोरोनामुक्त रुग्णांभोवती सुरक्षा कवच; व्हायरस काहीच बिघडवू शकत नाही आता संशोधक या एआय मॉडेलमार्फत अॅप विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून हा अॅप लोकांना मोबाइलमध्ये वापरता येईल. आपल्या मोबाइलसमोर फक्त खोकून ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाही हे समजण्यास मदत होईल. त्यामुळे आता लवकरच तुमची कोरोना टेस्ट तुमच्या हातात असणार आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Mobile

    पुढील बातम्या