मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मुंबईजवळ भयंकर रुपाचा Coronavirus सापडला; अँटिबॉडीलाही देतोय चकवा

मुंबईजवळ भयंकर रुपाचा Coronavirus सापडला; अँटिबॉडीलाही देतोय चकवा

कोरोनाचं हे रूप दक्षिण आफ्रिकेतील असल्याचं सांगितलं जातं आहे आणि हा यूकेतील स्ट्रेनपेक्षाही भयंकर आहे.

कोरोनाचं हे रूप दक्षिण आफ्रिकेतील असल्याचं सांगितलं जातं आहे आणि हा यूकेतील स्ट्रेनपेक्षाही भयंकर आहे.

कोरोनाचं हे रूप दक्षिण आफ्रिकेतील असल्याचं सांगितलं जातं आहे आणि हा यूकेतील स्ट्रेनपेक्षाही भयंकर आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 10 जानेवारी : भारतातील (India) कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय, आता लवकरच कोरोना लसीकरणही सुरू केली जाणार आहे. या बातम्यांमुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला न टाकला तोच धडकी भरवणाऱ्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आधी यूकेतील नवा कोरोनाची (Uk corona new strain) रुग्णांची भारतातही संख्या वाढू लागली आणि आता त्यात दक्षिण आफ्रिकेतील नवा कोरोनाही (south africa corona strain) भारताची आर्थिक राजधानी मुंबईजवळ पोहोचला आहे. कोरोनाचं हे रूप अधिकच भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

खारघरमधील टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील असे तीन रुग्ण आहेत, ज्यांच्यामध्ये  E484K म्‍युटेशन असलेला कोरोना व्हायरस सापडला आहे. हा व्हायरस दक्षिण आफ्रिकेत सापडलेला नवा कोरोनाव्हायरस असल्याचं सांगितलं जातं आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनपेक्षाही दक्षिण आफ्रिकेतील हा स्ट्रेन अधिक भयंकर आहे. कारण कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात तयार होणाऱ्या तिन्ही प्रकारच्या अँटिबॉडीज या व्हायरसविरोधात लढण्यास प्रभावी नाहीत. तीन रुग्णांपैकी रुग्ण ठाण्यातील आणि एक रायगडमधील आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार टाटा मेमोरिअल सेंटरचे डॉ. निखिल पाटकर यांनी सांगितलं की, सेंटरच्या टीमनं 700 नमुन्यांची जीन सिक्वेंसिंग केलं होतं. त्यापैकी तिघांमध्ये E484K  म्युटेशन सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाव्हायरचे तीन म्युटेशन आढळून आले. आमच्या रुग्णालयातील रुग्णांंमध्ये सापडलेला व्हायरसचा स्ट्रेन हा त्याच तीन म्युटेशनपैकी एक आहे.

दरम्यान बंगळुरूतील संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. गिरीधर बाबू म्हणाले, E484K  म्युटेशनवाला व्हायरस सप्टेंबर 2020 पासून नागरिकांमध्ये आहे. जर तो वेगानं पसरणारा असता तर आतापर्यंत परिस्थिती अधिकच गंभीर झाली असती. पण तसं झालं नाही. त्यामुळे या व्हायरसला घाबरण्याची गरज नाही.

यूकेत आढळलेल्या नव्या कोरोनाचे भारतात 90 रुग्ण आहेत. त्यापैकी 11 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी 3, पुण्यात 2 आणि मिरा-भाईंदरमध्ये एक रुग्ण आहे. दरम्यान मुंबईत गुजरात आणि गोव्यातील प्रत्येकी एका रुग्णावर मुंबईत उपचार सुरू आहेत. मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी एका रुग्णाला डिस्चार्जही देण्यात आला आहे. त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus