मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /विजेच्या तारेवर तडफडत होतं कबूतर; वाचवण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यानं जिवाची लावली बाजी VIDEO VIRAL

विजेच्या तारेवर तडफडत होतं कबूतर; वाचवण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यानं जिवाची लावली बाजी VIDEO VIRAL

कबुतराच्या जीवासाठी आपल्या जीवाचीही पर्वा न करता विद्युत कर्मचारी (electricity workers) थेट हायटेन्शन लाइनवर चढला.

कबुतराच्या जीवासाठी आपल्या जीवाचीही पर्वा न करता विद्युत कर्मचारी (electricity workers) थेट हायटेन्शन लाइनवर चढला.

कबुतराच्या जीवासाठी आपल्या जीवाचीही पर्वा न करता विद्युत कर्मचारी (electricity workers) थेट हायटेन्शन लाइनवर चढला.

भोपाळ, 2 जानेवारी : गेले काही दिवस सोशल मीडियावर (Social media) मुक्या जीवांना मारहाण केल्याच्या घटना समोर येत आहेत. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर माणसातील माणुसकी कायमची मेली की काय असंच वाटू लागलं. मात्र नाही अजूनही कुठेतरी माणुसकी जिवंत आहे. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. जिथं एका कबुतरासाठी (pigeon) व्यक्तीनं स्वतःच्या जिवाचीही पर्वा केली नाही.

मध्य प्रदेशच्या (madhya pradesh) भोपाळमधील (bhopal) ही घटना. एक कबूतर विजेच्या तारेवर तडफडत होतं. या तारेला मांजा अडकला होता आणि या मांजामध्ये हे कबूतर फसलं होतं. स्वतःला सोडवण्याचा ते खूप प्रयत्न करत होतं. इतक्यात तिथंच काम करत असलेल्या एका विद्युत कर्मचाऱ्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्यानं त्यावेळी मागचा पुढचा कोणताही विचार न करता तो थेट त्या विजेच्या खांबावरच चढला. हायटेन्शन लाइनवर तो चढला.

" isDesktop="true" id="509672" >

ही घटना किलनदेव फिडर इथली आहे. व्हिडीओत पाहू शकता. विद्युत कर्मचारी विजेच्या खांबावर चढतो. हायटेन्शन लाइवर चढून तो कबुतराला वाचवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला तो एक काठी घेऊन त्यानंतर कबुतराला सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा काही उपयोग नाही. त्यानंतर तो विजेच्या खांबावर आणखी वर जातो आणि हातानंच कबुतराला सोडवतो. सुटका होताच कबुतर भुर्रकन उडून जातं.

हे वाचा - इतकी हवा भरली इतकी हवा भरली की बॉम्बसारखा फुटला टायर आणि.... धडकी भरवणारा VIDEO

कबुतराला वाचवण्यासाठी या व्यक्तीनं स्वतःचा जीवही धोक्यात घातला होता. त्यालाही विजेचा शॉक लागू शकला असता आणि कदाचित त्याचाही मृत्यू झाला असता. पण आपल्या जीवाची जराही पर्वा न करता त्याने सर्वात आधी कबुतराचा विचार केला. सुदैवानं विद्युत कर्मचाऱ्यालाही काही झालं नाही.

First published:
top videos

    Tags: Madhya pradesh, Social media viral, Viral, Viral videos